
मुंबई – विधान परिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यत्वासाठी राज्यशासनाने सुचवलेल्या नावांतील ८ जणांची निवड करण्यात येऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांची निवड करण्यात येऊ नये, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
दिलीप आगाळे आणि शिवाजी पाटील यांनी ही याचिका केली आहे. ही याचिका फेटाळून लावण्याची मागणी राज्यशासनाकडून करण्यात आली आहे. राज्यपालांकडून नावे अंतिम होण्यापूर्वीच त्यांना विरोध करणे चुकीचे असून याला कायदेशीर तरतुदींनुसार उत्तर देण्यास शासन बांधील नाही, अशी भूमिका राज्यशासनाकडून न्यायालयात मांडण्यात आली आहे; मात्र न्यायालयाने याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश राज्यशासनाला दिला आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)