६ मासांत अन्वेषण करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
देशातील एका महत्त्वाच्या सुरक्षायंत्रणेकडून एका संवेदनशील प्रकरणात असा गलथानपणा होत असेल, तर त्याचा एकंदरीत कारभार कसा चालत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! यास दोषी असणार्या उत्तरदायींवर कारवाई करणे आवश्यक !

चेन्नई (तमिळनाडू) – येथील एका धाडीमध्ये सीबीआयने जप्त केलेले १०३ किलो ग्रॅम सोने गायब झाले आहे. एकूण ४५ कोटी रुपये मूल्य असलेले हे सोने सीबीआयच्या कह्यात असतांना गायब झाल्याने मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सीबी-सीआयडीला चौकशीचा आदेश दिला आहे.
103 kg gold worth Rs 45,00,00,000 (45 crore) has gone “missing” from the “safe” custody of CBI #Gold #CBI | @TanseemHaider https://t.co/mMMlve1VXM
— IndiaToday (@IndiaToday) December 12, 2020
‘या सर्व प्रकरणामुळे अन्वेषण यंत्रणांची प्रतिष्ठा अल्प होत आहे. त्यामुळे ६ मासांच्या आत याचे अन्वेषण करण्यात यावे’, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
वर्ष २०१२ मध्ये चेन्नईमधील सुराना कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयात धाड टाकून सोन्याच्या विटा आणि दागिने यांच्या स्वरूपात ४००.५ किलो ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते. हे सर्व सोने सीबीआयच्या ‘सेफ कस्टडी’मध्ये ठेवण्यात आले होते. आता यामधील १०३ किलोग्रॅम सोने गायब झाले आहे.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !