सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापुरच्या मंदिरात केली ग्रहशांती

अंधश्रद्धाविरोधी कायदा होण्यासाठी काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही प्रयत्न करत होती. त्यांच्या मंत्र्याने केलेली ग्रहशांती पक्षाला चालते का ?

धनंजय मुंडे यांनी केली शनी ग्रहशांती

नगर – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ३० जानेवारी या दिवशी सकाळी शनी ग्रहशांती आणि तेल अभिषेक करून स्वयंभू श्री शनिदेवाचे दर्शन घेतले. वंजारवाडी (ता. नेवसे) येथील संत वामन भाऊ सप्ताह सोहळ्यातील पुरस्कार वितरण कार्यक्रमास जातांना त्यांनी शनिशिंगणापूरला भेट दिली. ‘येथील दर्शनाने आत्मिक समाधान लाभले असून मनाला ऊर्जा प्राप्त झाली आहे’, असे त्यांनी सांगितले.