कॅसिनोंमुळे राज्यशासनाला मागील ९ वर्षांत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

जनतेला जुगारी बनवून मिळालेल्या महसुलातून केलेला विकास टिकेल का ? राज्यासाठी ईश्‍वर निधीची व्यवस्था करील, यावर विश्‍वास हवा !

पणजी, ३१ जानेवारी (वार्ता.) – वर्ष २०१२ पासून मागील ९ वर्षे कॅसिनोंमुळे राज्यशासनाच्या तिजोरीत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. या काळात तरंगत्या कॅसिनोंमुळे ७८५ कोटी ५२ लाख रुपये, तर भूमीवरील कॅसिनोंमुळे ४९१ कोटी ७६ लाख रुपये राज्यशासनाला मिळाले. राज्यात सुमारे ६ तरंगते कॅसिनो आहेत, तर डझनहून अधिक भूमीवरील कॅसिनो आहेत. गोवा शासन ‘गेमिंग कमिशन’साठी मसुदा सिद्ध करत आहे आणि गोमंतकियांना कॅसिनोत प्रवेशबंदीवर शासन विचार करत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.