देहलीमधील हिंसाचारामध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान ! – पंतप्रधान मोदी

नवी देहली – २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये हिंसाचार झाला. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला गेला. ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दु:खी आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रम ‘मन की बात’ मध्ये केले; मात्र त्यांनी शेतकरी आंदोलनाचा कुठलाही उल्लेख केला नाही.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे आणि अनेक पावले उचलत आहे. सरकारचे प्रयत्न चालूच रहातील.