अनंतनागमध्ये ६ आतंकवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक

अशांना आता पोसण्याऐवजी त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर पोलिसांनी ‘लष्कर-ए-मुस्तफा’ या नव्या जिहादी आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांना अटक केल्यावर त्यांच्या चौकशीनंतर जैश-ए-महंमदच्या ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.