Mahakumbh 2025 : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याला संत-महंतांचे भरभरून आशीर्वाद !
विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढले गौरवोद्गार !
विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढले गौरवोद्गार !
महाकुंभक्षेत्री सेक्टर ७ मध्ये लावण्यात आलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शन कक्षाला भाविकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेले मान्यवर कक्षाला भेट देऊन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याचे कौतुक करत आहेत.
इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (निवृत्त) डॉ. नलिनी आणि शास्त्रज्ञ (निवृत्त) डॉ. सतीश यांनी महाकुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कक्षाला भेट दिली. प्रदर्शन पाहिल्यानंतर त्यांना पुष्कळ आनंद झाला.
महाकुंभक्षेत्री आल्यानंतर मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कक्षाला भेट दिली, त्यांच्या प्रतिनिधींशी बोललो. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘एका सामान्य व्यक्तीने अध्यात्मात पुढे कसे जावे’, याचे अतिशय सोपेपणाने विश्लेषण केले आहे.
‘उत्तर-मध्य रेल्वे’चे महाव्यवस्थापक शरत सुधाकर चंद्रायन यांनी महाकुंभक्षेत्री महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कक्षाला सपत्नीक भेट दिली.
श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.
या वेळी सर्व संत-महंतांनी ‘आम्ही प्रदर्शन पहाण्यासाठी निश्चित येऊ’, असे सांगितले.
गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगल्याप्रकारे चालू आहे. समितीच्या कार्याविषयी मला माहिती आहे’, असे सांगून कार्याला आशीर्वाद दिला.
मुसलमानांना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला लहानपणापासून शिकवतात; म्हणून ते जगभर त्यांचा प्रभाव पाडतात. याउलट हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’