महाकुंभक्षेत्री प्रदर्शनाला भेट देणारे वाराणसी येथील फॅकल्टी ऑफ आयुर्वेद, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे डॉ. के. के. सिंह यांचे मत
यूजीसी म्हणजे काय ?यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन तथा विद्यापीठ अनुदान आयोग. भारत सरकारच्या शैक्षणिक मंत्रालयाच्या अंतर्गत हा आयोग काम करतो. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आणि गुणवत्ता राखण्याचे कार्य हा आयोग करतो. |
प्रयागराज, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री आल्यानंतर मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कक्षाला भेट दिली, त्यांच्या प्रतिनिधींशी बोललो. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘एका सामान्य व्यक्तीने अध्यात्मात पुढे कसे जावे’, याचे अतिशय सोपेपणाने विश्लेषण केले आहे. इथे मला पुष्कळ सकारात्मकता जाणवली. अध्यात्माविषयी जी जुजबी माहिती प्राप्त होते, त्यानुसार व्यक्ती साधना करते; परंतु एका विश्वविद्यालयाकडून साधनेसाठी मार्गदर्शन मिळाले, तर साधनेत योग्य दिशेने मार्गक्रमण करता येईल. असे विश्वविद्यालय आहे, याचा मला पुष्कळ आनंद आहे. माझी सरकारला विनंती आहे की, या विश्वविद्यालयाला मान्यता द्यावी आणि ‘युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन’नेही (‘यूजीसी’ तथा विद्यापीठ अनुदान आयोगा’नेही) विश्वविद्यालयाला सहकार्य करावे. यातून युवा वर्गाला योग्य दिशा मिळेल आणि अध्यात्माचा, आध्यात्मिक चेतनेचाही विस्तार होईल’ असे मत डॉ. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मधील आयुर्वेद विषयाचे प्राध्यापक डॉ. के.के. सिंह यांनी व्यक्त केले. त्यांनी प्रयागराज येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने प्रयागराज येथील महाकुंभक्षेत्री उभारलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्यांचे मत मांडले.