Hindu Janajagruti Samiti Invitation At Mahakumbh : प्रयागराज येथील हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला भेट देण्यासाठी संत-महंतांना निमंत्रण

फतेपूर येथील सिद्धाश्रम सेवा संस्थेचे स्वामी परमचैतन्य ब्रह्मचारी महाराज (मध्यभागी)

प्रयागराज, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीने येथील सेक्टर ६ मध्ये प्रदर्शन कक्ष उभारला आहे. या कक्षाला भेट देण्यासाठी अनेक संत-महंतांना समितीकडून निमंत्रण देण्यात येत आहे.

भदोही (उत्तरप्रदेश) येथील बडे शिवधाम गोपीगंजचे योगी सितारामजी महाराज (डावीकडे)

हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे आणि श्री. सतीश सोनार यांनी फतेपूर येथील सिद्धाश्रम सेवा संस्थेचे स्वामी परमचैतन्य ब्रह्मचारी महाराज, भदोही (उत्तरप्रदेश) येथील बडे शिवधाम गोपीगंजचे योगी सितारामजी महाराज, करपात्री शक्तिपीठ महामनापुरीचे पीठाधीश्‍वर डॉ. आनंद चैतन्य ब्रह्मचारीजी दयालुजी महाराज, निंबर्काचार्य पीठाचे श्री अमेंद्रकृष्ण गोस्वामी यांची भेट घेऊन समितीच्या प्रदर्शनकक्षाला भेट देण्यासाठी निमंत्रण दिले.

निंबर्काचार्य पीठाचे श्री अमेंद्रकृष्ण गोस्वामी (उजवीकडे)

या वेळी सर्व संत-महंतांनी ‘आम्ही प्रदर्शन पहाण्यासाठी निश्‍चित येऊ’, असे सांगितले.