
प्रयागराज, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (निवृत्त) डॉ. नलिनी आणि शास्त्रज्ञ (निवृत्त) डॉ. सतीश यांनी महाकुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कक्षाला भेट दिली. प्रदर्शन पाहिल्यानंतर त्यांना पुष्कळ आनंद झाला.
या वेळी डॉ. नलिनी म्हणाल्या की, अनपेक्षितपणे आम्ही येथे या अतिशय आनंदी वातावरण असलेल्या कक्षात पोचलो. येथील सर्वच गोष्टी विज्ञानाशी जोडलेल्या आहेत, तसेच भारतीय संस्कृतीतील सांगितलेले ज्ञान येथे फलकांच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. येथील साधक पुष्कळ नम्र आहेत. येथे आल्यानंतर मला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. माझे अध्यात्मातील ज्ञान अगदी बालवाडीत असल्यासारखे आहे. अध्यात्मात कसे पुढे जायचे, हे शिकण्यासाठी आम्ही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून घेण्यात येणार्या शिबिराला निश्चित जाऊ.