राज्यातील शिवकालीन वास्तू, शस्त्र, कागदपत्रे आदी ऐतिहासिक ठेव्याचे जतन होणार !
पुरातत्व विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून यामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात योगदान देणार्या मावळ्यांच्या वंशजांचा समावेश केला आहे. या ऐतिहासिक ठेव्यांचा एकत्रित संग्रह करून त्यांचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे.