नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण
नागपूर – नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर ३ जानेवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटिसीच्या माध्यमातून येत्या ६ जानेवारीपर्यंत राज्य सरकारला या प्रकरणी उत्तर सादर करायचे आहे. त्यानंतर या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या ९ जानेवारी या दिवशी होणार आहे.
२२ डिसेंबर या दिवशी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना विविध गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून कमाल ५ वर्षे सश्रम कारावास आणि एकूण १२ लाख ५० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर केदार यांच्या अधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने हे आदेश दिले.