आजचे वाढदिवस

मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी (११.१२.२०२४) या दिवशी मंगळुरू, कर्नाटक येथील कु. चरणदास रमानंद गौडा याचा १० वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आई आणि साधक यांना जाणवलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

बांगलादेशात सैन्‍य घुसवा ! 

बांगलादेश सरकार पाकिस्‍तानशी जवळीक साधून शस्‍त्रेे खरेदी करत आहे. पाकच्‍या साहाय्‍याने भारतात जिहादी आतंकवाद पसरवण्‍याची योजना सरकार आखत आहे, अशी माहिती पाकिस्‍तानी वंशाचे अमेरिकी उद्योगपती साजिद तरार यांनी दिली.

संपादकीय : सीरियातील सत्तापालट !

जगाच्‍या पाठीवर ‘जिथे बहुसंख्‍यांक मुसलमान तिथे अशांती’, असेच का दिसते ? याचे उत्तर भारतातील निधर्मीवादी देतील का ?

अयोग्‍य गोष्‍टींना वेळीच ‘नकार’ द्या !

अयोग्‍य गोष्‍टींना योग्‍य वेळी ‘नकार’ दिल्‍यास मनुष्‍याचे व्‍यक्‍तीमत्त्व घडते आणि विकसितही होते. मनुष्‍याची सद़्‍सद्विवेकबुद्धी जागृत होते. बुद्धीला सामर्थ्‍य आणि मनाला शुद्धता, निर्मळता अन् सात्त्विकता प्राप्‍त होते.

आपल्‍या कष्‍टास यश येणे, हे केवळ परमेश्‍वराच्‍या कृपेवरच अवलंबून !

आपण स्‍वतःला नास्‍तिक म्‍हणवतो, तर त्‍याने जेथे ‘लाथ मारीन तेथे पाणी काढीन’, अशी धमक दाखवली पाहिजे.

अतिरिक्‍त ‘प्रोटीन’ मिळवण्‍यासाठी प्रयत्न करत आहात, सावधान !

जे लोक व्‍यायाम अल्‍प करतात, खाल्लेले पचत नसल्‍याने अशक्‍त वाटल्‍याने ऊर्जा किंवा उत्‍साह मिळावा; म्‍हणून ‘प्रोटीन पावडर’ खातात आणि मग शनिवार-रविवार बाहेर ‘जंक फूड’ घेतात. यामध्‍ये प्रोटीन खाऊन ते अंगी लागणार नाही. त्‍याचे रूपांतर शेवटी चरबीमध्‍येच होणार हे नक्‍की.

व्‍यायामामुळे पचन कसे सुधारते ?

आतड्यांमधील सूक्ष्म जिवाणू ‘ब्‍यूटिरेट’ (Butyrate)सारखी रसायने निर्माण करतात. जी आतड्यांची अखंडता राखण्‍यासाठी महत्त्वाची ठरतात. व्‍यायामामुळे हे सूक्ष्म जिवाणू अधिक कार्यक्षम होतात आणि आतडे दुर्बल होण्‍यापासून परावृत्त करतात.

भारतीय स्‍वातंत्र्यलढ्यात भगवद़्‍गीतेतील तत्त्वज्ञानाचा क्रांतीकारकांवर असलेला प्रभाव !

वर्ष १९०१ मध्‍ये कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील राष्‍ट्रीय काँग्रेसच्‍या अधिवेशनाच्‍या वेळी टिळकांनी स्‍वामी विवेकानंद यांची भेट घेतली. या भेटीत चापेकर बंधूंच्‍या हौतात्‍म्‍याचा विषय निघाला असतांना ‘चापेकर बंधूंचे पुतळे भारतात जागोजागी उभारले गेले पाहिजेत’, असे उद़्‍गार स्‍वामी विवेकानंद यांनी काढले.

भक्‍तीयोग जाणून घेतांना…

भक्‍तीमार्ग हा त्‍यामानाने सोपा आहे. जसजशी भगवंतावर आपली श्रद्धा वाढत जाते, त्‍या प्रमाणात अन्‍य गोष्‍टींविषयी निर्माण झालेली आसक्‍ती कमी कमी होत जाऊन भगवंतावरील आसक्‍ती वाढते.

शतपैलू सावरकर

सावरकर यांच्‍यावर गुदरलेल्‍या अनेक प्रसंगांतून त्‍यांची धैर्यशीलता दिसून येते. संबंधात येणार्‍या व्‍यक्‍तींच्‍या गुणांना प्रोत्‍साहन देणार्‍या अनेक प्रसंगांतून तात्‍यारावांची गुणग्राहकता जाणवते.