शिवमय वातावरणात आणि उत्‍साहात प्रतापगड येथे ‘शिवप्रतापदिन’ साजरा

श्री भवानीमातेच्‍या मंदिरासमोर ध्‍वजस्‍तंभाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पूजन झाले. भगव्‍या ध्‍वजाचे ध्‍वजारोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्‍या हस्‍ते केले. मानाच्‍या पालखीची मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पूजा करण्‍यात आली.

विनापरवाना भंगार व्‍यवसाय करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिखली, कुदळवाडी भागातील विनापरवाना भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी, रोहिंग्‍या घुसखोर यांवर कठोर कारवाई करावी.

मध्‍यरात्रीपर्यंत ध्‍वनीवर्धक चालू ठेवणार्‍या कल्‍याणीनगरमधील हॉटेल मालकावर गुन्‍हे नोंद !

कल्‍याणीनगर भागातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर या भागात मध्‍यरात्रीपर्यंत चालू रहाणारे हॉटेल, पब विरोधात नागरिकांनी तीव्र रोष व्‍यक्‍त करत तक्रारी केल्‍या होत्‍या.

कारखाने आणि हॉटेलचालक यांनी कचरा उघड्यावर टाकल्यास कठोर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

औद्योगिक कारखाने आणि हॉटेलचालक त्यांचा कचरा गावाच्या वेशीवर आणून टाकत आहेत. अशा प्रकारांत वाढ झालेली आहे आणि हे प्रकार त्वरित थांबवावे, अन्यथा सरकार संबंधितांची वीज आणि पाणी यांची जोडणी तोडणे अन् आस्थापनांना टाळे ठोकणे, अशी कठोर कारवाई करणार आहे.

पाकिस्तानात जन्मलेले शेन पेरेरा यांना ‘सी.ए.ए.’ अंतर्गत भारतीय नागरिकत्व बहाल

‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या (सी.ए.ए.च्या) अधिनियमाच्या अंतर्गत पाकिस्तानात जन्मलेले गोव्यातील रहिवासी शेन सेबॅस्टियन पेरेरा आणि त्यांचे कुटुंबीय यांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे.

भविष्यकाळात पर्यायी ऊर्जेकडे वळणे आवश्यक ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

भविष्यात औष्णिक ऊर्जेचा दीर्घकाळ वापर करणे शक्य नसल्याने इतर पर्यायी ऊर्जास्रोतांकडे वळणे आवश्यक आहे, असे वक्तव्य वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

कथित सर्वधर्मसमभाव !

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात. असा अर्थ एका तरी धर्मात सांगितलेला आहे का ? तरी अतीशहाणे ‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणतात !’

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ‘व्हॉटस्ॲप’चा गट दबाव आणणार !

जनतेला अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

आजचे वाढदिवस

मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी (११.१२.२०२४) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील श्रीमती सुलभा  मालखरे (आध्‍यात्मिक पातळी ६९ टक्‍के) यांचा ८५ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.