इलॉन मस्क यांची मागणी
(‘ग्रूमिंग गँग’ म्हणजे लहान मुली किंवा तरुणी यांनी जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणे)
लंडन : अब्जाधीश इलॉन मस्क यांनी पाकिस्तानी ‘ग्रूमिंग गँग’ प्रकरणी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, ‘‘ही प्रकरणे उजेडात आली, तेव्हा स्टार्मर हे संबंधित अन्वेषण समितीचे अध्यक्ष होते; पण तरीही त्यांनी आरोपींच्या विरोधात खटला चालवण्यास अनुमती दिली नाही. आता पंतप्रधान असतांनाही स्टार्मर ही प्रकरणे झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी स्टार्मर यांना बडतर्फ करावे.’’ सामाजिक माध्यमांवरील एका पोस्टमध्ये मस्क यांनी स्टार्मर यांना कारागृहात पाठवण्याची मागणीही केली आहे. (धर्मांध मुसलमान जेथे जातात, तेथे अत्याचार, कट्टरतावाद आणि आतंकवाद ओघानेच येतो, ही वस्तूस्थिती आहे; मात्र कथित धर्मनिरपेक्षतेचे सोंग पांघरलेल्या ब्रिटनसह पाश्चात्य देशांना हे कधी उमजेल ? – संपादक)
१. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी इलॉन मस्क यांच्या सरकारवरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. स्टार्मर यांनी मस्क यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत सांगितले की, जे खोटे आणि चुकीची माहिती पसरवत आहेत त्यांना पीडितांमध्ये रस नाही. त्यांना केवळ स्वतःमध्येच रस असतो.
२. ‘ग्रूमिंग’ प्रकरणी अन्वेषण करण्यासाठी प्रा. लेक्स जे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीला वर्ष १९९७ ते २०१३ या कालावधीत १ सहस्र ४०० हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे आढळून आले. बहुतेक आरोपी पाकिस्तानी वंशाचे होते. समितीच्या अहवालात दोषी पाकिस्तानींवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती.
३. पाकिस्तानी स्थलांतरितांवर कारवाई न केल्याचा आरोप स्टार्मर यांच्यावर होऊ लागला. ‘व्होट बँक’च्या राजकारणामुळे स्टार्मर कारवाई करत नसल्याचा आरोप कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते केमी बेडनोच यांनी केला आहे.