Prayagraj Kumbh Parva 2025 : राजयोगी स्नान उत्सवाच्या वेळी महाकुंभक्षेत्री जाण्यासाठी ४ ठिकाणांहून भाविकांना प्रवेश !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

मुख्य राजयोगी स्नान सोहळा !

प्रयागराज : महाकुंभाच्या काळात मुख्य राजयोगी स्नान सोहळ्याला येणार्‍या भाविकांना ४ ठिकाणांहून प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना काही रस्त्यांनी संगमाला जाता येईल, तर त्रिवेणी मार्गाने परतता येईल. १३ जानेवारी या दिवशी पौष पौर्णिमा आणि १४ जानेवारी या दिवशी मकर संक्रांती या दोन्ही दिवशी ही पद्धत लागू होणार आहे.

महाकुंभक्षेत्राचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार द्विवेदी म्हणाले की, मुख्य राजयोगी स्नान उत्सवाला अधिक गर्दी होईल. हे लक्षात घेऊन स्नानाच्या पर्वांच्या वेळी आणि सामान्य दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. मुख्य राजयोगी स्नानाच्या वेळी परिसरात ४ बिंदूंमधून प्रवेश करता येतो. यामध्ये जीटी जवाहर, हर्षवर्धन तिराहा, बांगर स्क्वेअर आणि काली मार्ग-२ यांचा समावेश आहे. महाकुंभक्षेत्री आल्यानंतर भाविकांना काली मोरीमार्गे संगमाला जाता येणार आहे. परतीचा प्रवास त्रिवेणी मार्गाने होईल.