प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज – महाकुंभपर्वात कोट्यवधींच्या संख्येने येणार्या भाविकांशी कसे वागावे ?, याचे प्रशिक्षण पोलिसांनंतर उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या कर्मचार्यांनाही देण्यात येत आहे. महाकुंभपर्वासाठी येणार्या भाविकांची यात्रा अविस्मरणीय होण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासह भाविकांच्या सेवेसाठी असणारे परिवहन विभागातील सर्व चालक आणि वाहक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असू नयेत, या उद्देशाने सर्व चालक आणि वाहन यांचे पोलीस व्हेरिफिकेशन (पडताळणी) करण्यात आले आहे. तरीही जर कुठल्या चालक किंवा वाहकाने कुठल्याही प्रवाशाशी चुकीचे वर्तन केल्यास त्याच्याविरुद्ध परिवहन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्व चालक आणि वाहक यांना त्यांच्या सेवेकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याचेही धडे दिले जात आहेत.