डोंबिवली – येथे मानपाडा पोलिसांनी विक्री करण्यासाठी आणलेले हत्तीचे २ दात एम्.आय.डी.सी. भागातून जप्त केले आहेत. या दातांचे बाजारातील एकूण मूल्य १० लाख रुपये इतके आहे. या प्रकरणी कोकणातून आलेल्या दोघांना पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याने गुन्हा नोंदवला आहे.
दोन जण हस्तीदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई केली.
संपादकीय भूमिकाअशांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |