अतिरिक्‍त ‘प्रोटीन’ मिळवण्‍यासाठी प्रयत्न करत आहात, सावधान !

जे लोक व्‍यायाम अल्‍प करतात, खाल्लेले पचत नसल्‍याने अशक्‍त वाटल्‍याने ऊर्जा किंवा उत्‍साह मिळावा; म्‍हणून ‘प्रोटीन पावडर’ खातात आणि मग शनिवार-रविवार बाहेर ‘जंक फूड’ घेतात. यामध्‍ये प्रोटीन खाऊन ते अंगी लागणार नाही. त्‍याचे रूपांतर शेवटी चरबीमध्‍येच होणार हे नक्‍की.

थंडीतील आजारपणे आणि त्यावर घ्यावयाचे उपचार !

शहरातील थंडीत सर्दी, खोकला इत्यादी ‘अ‍ॅलर्जी’चे रोग होत रहातात. ‘थंडीमध्ये आरोग्य उत्तम रहाते, माणूस आजारी पडत नाही’; पण असे प्रत्यक्षात दिसत नाही. अशा वेळी सरधोपटपणे ‘अग्नी उत्तम असतो, चला आता काहीही खाऊ-पिऊ’, असा दृष्टीकोन त्रासदायक ठरतो.

विचारांची श्रृंखला आणि त्यावर उपाय !

जेव्हा भूतकाळातील एखादी घटना तुमच्या विचारांची साखळी चालू करते, तेव्हा वेळीच पुस्तक वाचन वा अन्य वेगळ्या ठिकाणी मन रमवा. 

प्रतिदिन पदार्थांच्या माध्यमातून पोटात जाणार्‍या विषवत् स्थितीवर उपाययोजना !

सध्याच्या पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्‍या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते ती, म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे.

मुले, काम, तारांबळ आणि उपाययोजना

दोन मुलांची आई आणि वैद्य या नात्याने काही गोष्टी मला जाणवल्या ते येथे देत आहे.

विविध प्रकारच्या तणावाच्या स्थितीत करावयाच्या काही उपाययोजना !

ज्या गोष्टी पालटता येणार नाही, त्यावर त्रागा न करणे, प्राप्त परिस्थितीत सर्वांत चांगले करायचा प्रयत्न आणि आपल्या परिस्थितीसाठी दुसर्‍याला दोषी न धरणे यातूंन संकटांना तोंड देतांना बर्‍याच अंशी मानसिक शक्ती मिळवता येईल हे नक्की !

आईपण आणि आरोग्य

‘डॉक्टर आयुष्यात कधी गुडघे दुखले नाहीत हो माझे. बाळ आता जेमतेम ३ महिन्यांचे होत आहे, तरी गुडघे ताठ करतांना हाताने आधार देऊन सरळ करायला लागतात’, हे चाळीशीला आलेली नव्यानेच आई झालेली रुग्ण बोलत होती.

‘चिकनगुनिया’ची लक्षणे जाणवताच पुढील उपचार करा !

सध्याच्या रुग्णांमध्ये ‘चिकनगुनिया’ची चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह म्हणजे चिकुनगुन्या झालेला नसणे) आली असली, तरीही सगळी लक्षणे त्या आजाराची दिसत आहेत.

रजोनिवृत्ती : सर्वसाधारण नियम

साधारण रजोनिवृत्ती वयाच्या आसपास अपान क्षेत्रातील त्रास वाढायला प्रारंभ होतो. साध्या भाषेत अपान वायू हा शरिरातील बेंबीखालील भागात काम करणारा वायू असून तो मुख्यतः मलपदार्थ बाहेर काढणारा आहे.

वेग आणि परिणाम

‘घाई’, मसालेदार पदार्थ सेवन करणे आणि ‘काळजी करणे’, ही ३ आम्लपित्त अन् त्यातून उत्पन्न होणार्‍या पचनाच्या पुढच्या आजारांची बीज कारणे आहेत. यासाठी काही गोष्टींचा विचार करावा.