पुणे येथे निषेध आंदोलन !
पुणे – ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या ताईला न्याय मिळेल का ?’, ‘जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे !’, अशा घोषणा देत राज्यासह संपूर्ण भारतात जिहाद्यांकडून निष्पाप लोकांवर होत असलेल्या आक्रमणांच्या निषेधार्थ आणि आक्रमणातील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी ‘पतित पावन संघटने’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुणे येथील बालगंधर्व चौकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.
पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष श्री. स्वप्नील नाईक म्हणाले की, पुण्यासह संपूर्ण भारतामध्ये जिहाद्यांनी लव्ह जिहाद, गोरक्षकांची हत्या करणे, त्यांच्यावर आक्रमण करणे असे प्रकार केले आहेत. या विरोधात पतित पावन संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. ‘जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या आक्रमणांचा निषेध म्हणून एक प्रतिकात्मक छायाचित्र जाळण्यात आले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी शिवाजी चव्हाण, शहराध्यक्ष स्वप्नील नाईक, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, कामगार महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रोहन मोहोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.