कराड (सातारा) येथील घटना !
कराड (जिल्हा सातारा) – येथील मलकापूर येथे दुसर्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत प्रियकराने प्रेयसीला दुसर्या मजल्यावरून ढकलून दिल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आरुषी सिंग असे प्रेयसीचे नाव असून ध्रुव छिक्कर असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. १ ऑगस्ट या दिवशी ध्रुववर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असल्यामुळे अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
आरुषी आणि ध्रुव देहलीत एकत्र शिकत असतांना प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांनी कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये एकत्रच प्रवेश घेतला. कॉलेजच्या जवळच असलेल्या सन सिटी इमारतीमध्ये आरोपी रहात होता. ध्रुवने आरुषीला आपल्या सदनिकेत बोलावून घेतले होते. ‘तुझे दुसर्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत’, असे म्हणत त्याने आरुषीला दुसर्या मजल्यावरून ढकलून दिले. यात आरुषीचा जागीच मृत्यू झाला. या वेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही घायाळ झाला असून त्याचा पाय मोडल्याचे सांगण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकासंयमाचा अभाव असणार्या तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! |