कोल्हापूर – ‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागासाठी ६ नवीन शयनयान (स्लीपर) गाड्या प्राप्त झाल्या आहेत. त्यांपैकी प्रतिदिन कोल्हापूर-बोरीवली (रात्री ८.३० वाजता), कोल्हापूर-मुंबई (रात्री ९.३० वाजता), तसेच कोल्हापूर-शिर्डी (रात्री ८ वाजता) या गाड्या चालू करण्यात आल्या आहेत. एका बसची प्रवासीक्षमता ३० इतकी आहे. या गाड्यांचे आगाऊ आरक्षण उपलब्ध आहे. या गाड्यांमध्ये महिलांना ५० टक्के सवलत, तर ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’च्या अंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. तरी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > ‘एस्.टी.’ची कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-शिर्डी शयनयान बससेवा चालू !
‘एस्.टी.’ची कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-शिर्डी शयनयान बससेवा चालू !
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !