Benjamin Netanyahu : गाझा कह्यात घेण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही ! – पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

ज्या दिवशी आम्ही हमासचा पराभव करूए त्या दिवशी गाझामध्ये एक नवी पहाट उगवेल. विजयानंतरही आम्ही गाझावर काही काळ नियंत्रण ठेवू, जेणेकरून ही भूमी पुन्हा इस्रायलसाठी धोका निर्माण ठरू नये.

Paris Olympics Hamas Threat : पॅरिस ऑलिंपिकमध्ये रक्ताच्या नद्या वाहण्याची धमकी देणारा हमासचा व्हिडिओ प्रसारित !

व्हिडिओ बनावट असल्याचा हमासचा दावा, तरीही फ्रान्सने सुरक्षा वाढवली

Christopher Luxon : न्यूझीलंडमध्ये गेल्या ७० वर्षांत २ लाख मुले, तरुण आणि अशक्त प्रौढ यांच्यावर अत्याचार !

न्यूझीलंडमध्ये तपासणीत असे आढळून आले की, गेल्या ७० वर्षांत २ लाख मुले आणि अशक्त प्रौढ यांची देखभाल केली जात असतांना त्यांच्यावर अत्याचार झाले. हे निंदनीय कृत्य समोर आल्यानंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी क्षमा मागत त्यात सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

पुणे येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. गेल्या २४ तासांत ३७० मि.मी. पाऊस पडला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वसाहती, वस्त्या यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची हानी झाली आहे.

भाग्यनगरहून येऊन विशाळगडावरील मुसलमानांना पैसे वाटणार्यांची चौकशी करा !

विशाळगडावर ‘हैदराबाद युथ करेज’ नावाच्या गटाने नोटांची बंडले वाटल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे. हा पैसा या गटाला कुठून उपलब्ध झाला आणि हे पैसे वाटून त्यांना काय साध्य करायचे आहे ?

मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे ! – प्रवीण दरेकर, गटनेते, विधान परिषद

जरांगे पाटील यांना सत्तेची आस लागली आहे. त्यांच्या विधानातून हे आता स्पष्ट होत आहे. त्यांच्या या ‘नौटंकी’पुढे आता मराठा समाज झुकणार नाही. अशी टीका विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी २४ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा’ची स्थापना !

माजी आमदार नितीन शिंदे यांचा ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून समावेश !

राज्यातील २४५ उपसा जलसिंचन संस्थांच्या थकित मुद्दलाची रक्कम राज्यशासन देणार !

सांगली जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकित कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी सांगलीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. 

ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांना ‘सर्वोत्कृष्ट व्यंगचित्र’ पुरस्कार प्रदान !

सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रासाठीचा पुरस्कार गेल्या ४४ वर्षांमध्ये, विविध संस्थांच्या स्पर्धांमध्ये यापूर्वी श्री. विवेक मेहेत्रे यांना ९ वेळा प्राप्त झालेला आहे. 

पालघर येथील आश्रमशाळेत विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले !

या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजले नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र या घटनेची चर्चा होत आहे.