पंतप्रधान लक्सन यांनी मागितली क्षमा !
वेलिंग्टन (न्यूझीलंड) – न्यूझीलंडमध्ये तपासणीत असे आढळून आले की, गेल्या ७० वर्षांत २ लाख मुले आणि अशक्त प्रौढ यांची देखभाल केली जात असतांना त्यांच्यावर अत्याचार झाले. हे निंदनीय कृत्य समोर आल्यानंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी क्षमा मागत त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. या अत्याचारांमध्ये बलात्कार, नसबंदी आणि इलेक्ट्रिक शॉक यांचा समावेश होता.
चौकशीत असे आढळून आले आहे की, जवळजवळ ३ पैकी १ बालक आणि अशक्त प्रौढ यांनी वर्ष १९५० ते २०१९ या काळात काही प्रकारचे अत्याचार अनुभवले.
पंतप्रधान लक्सन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, न्यूझीलंडच्या इतिहासातील हा काळा आणि दुःखद दिवस आहे. या परिस्थितीत आम्ही निश्चित सुधारणा करू, असा माझा निर्धार आहे.