व्हिडिओ बनावट असल्याचा हमासचा दावा, तरीही फ्रान्सने सुरक्षा वाढवली
पॅरिस (फ्रान्स) – ऑलिंपिक आणि पॅरा संलग्न (पॅरा) ऑलिंपिक खेळांची सर्वांत मोठी स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथेे २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या संदर्भात एका आतंकवाद्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तो ‘हमासचा सैनिक’ असल्याचा दावा करत असून त्याने तो ‘पॅरिस ऑलिंपिकमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील’ अशी अरबी भाषेत धमकी देतांना दिसत आहे. तज्ञांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे, तसेच हमासचा नेता इज्जत अल्-रिशेक याने हा व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे; मात्र हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यापासून फ्रान्सकडून ऑलिंपिक स्पर्धेच्या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फ्रान्स सरकारने कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी ३५ सहस्र पोलीस अधिकारी तैनात करण्याची योजना आखली आहे. उद्घाटन समारंभासाठी ४५ सहस्र अधिकारी तैनात असणार आहेत.
या व्हिडिओमध्ये आतंकवादी म्हणतो की, पॅरिसचे रस्ते रक्ताने लाल होतील. पॅरिस ऑलिंपिकमध्ये रक्ताच्या नद्या वहातील. तुम्ही लोकांनी ज्यूंना खेळायला बोलावले आहे. आता तुम्हा सर्वांना याची शिक्षा भोगावी लागेल.
पॅलेस्टिनी आतंकवाद्यांनी याआधी केली आहेत ऑलिंपिकवर आक्रमणे !
ऑलिंपिकवर यापूर्वी आक्रमणे झाली आहेत. सप्टेंबर १९७२ मध्ये म्युनिक येथे आणि वर्ष १९९६ मध्ये अटलांटा येथे ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी पॅलेस्टिनी आतंकवाद्यांनी आक्रमणे केली आहेत. या आक्रमणांत इस्रायलचे अनेक खेळाडू ठार झाले होते.
संपादकीय भूमिकाहमासचा व्हिडिओ बनावट असला, तरी पॅलेस्टाईन आणि हमास यांचा इतिहास पहाता ऑलिंपिकवर आक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ! |