प्रत्येक गडावरील अतिक्रमण हटवणे ही सरकारची भावना ! – गृहमंत्री

आताच्या परिस्थितीत शांतता प्रस्थापित करणे अपेक्षित आहे. केवळ विशाळगडावरील नाही, तर राज्यातील प्रत्येक गडावर असलेले अतिक्रमण हटवण्याची सरकारची भावना आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

Bail In Gauri Lankesh Murder : अमित डेगवेकर, सुरेश एच्.एल्. आणि नवीन कुमार यांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाकडून जामीन संमत !

या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने यापूर्वी जामीन संमत केला आहे. हे लक्षात घेऊन आम्‍हालाही जामीन द्यावा’, अशी मागणी केली होती.

पंढरपूर येथे निघालेल्या वारकर्‍यांच्या बसचा अपघात; ५ वारकर्‍यांचा मृत्यू !

अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. बसमध्ये ५४ जण होते. त्यांपैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

वाचनाची गोडी निर्माण होण्‍यासाठी महाराष्‍ट्रात ‘महावाचन उत्‍सव’ राबवण्‍यात येणार !

विद्यार्थ्‍यांना वाचन संस्‍कृतीसाठी प्रोत्‍साहित करणे, मराठी साहित्‍याशी नाळ जोडणे, विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा विकास, संवाद कौशल्‍याचा विकास आदी उद्देश ठेवून हा उपक्रम राबवण्‍यात येणार आहे.

Asaduddin Owaisi on Pilgrimage Scheme : (म्‍हणे) ‘योजनेत मुसलमान समाजाच्‍या केवळ २ स्‍थळांची नावे घातली !’

हा हिंदुस्‍थान आहे. देशात आणि राज्‍यात मंदिरांची संख्‍या अधिक आहे, तसेच महाराष्‍ट्रात बहुसंख्‍य हिंदू आहेत. त्‍यामुळे या योजनेत हिंदु तीर्थस्‍थळांची संख्‍या अधिक असणे स्‍वाभाविक आहे !

Vijay Temple Tourist Destination : क्रूरकर्मा औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या मध्यप्रदेशातील विजय मंदिराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार !

मुसलमान आक्रमकांनी नष्ट केलेल्या भारतातील सर्वच मंदिरांचा पर्यटनस्थळ म्हणून नव्हे तर धार्मिक स्थळ म्हणून जीर्णोद्धार करणे आवश्यक आहे.

DGP Swain On J&K Terrorism : जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांमुळे आतंकवाद वाढला !

गेली ३५ वर्षे जे कोणत्याच पोलीस अधिकार्‍याने सांगण्याचे धाडस केले नाही, ते  आर्.आर्. स्वेन यांनी केले आहे. आता अशा राजकारण्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईही करणे आवश्यक आहे !

Srinagar Palestinian Flags : श्रीनगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत झडकावण्यात आले पॅलेस्टाईनचे ध्वज !

काश्मीरमध्ये अद्यापही जिहादी मानसिकेते लोक आहेत, हेच यावरून पुन्हा दिसून येते !

Kannada Development Authority : कर्नाटकातील मदरशांमध्ये आठवड्यातून २ दिवस कन्नड शिकवणार ! – पुरुषोत्तम बिळिमले, अध्यक्ष, कन्नड विकास प्राधिकरण

राज्यातील मदरशांमध्ये आठवड्यातून २ दिवस कन्नड शिकवण्यात येणार आहे, अशी माहिती कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळिमले यांनी दिली. प्रारंभी ही योजना बेंगळुरू, विजयपूर, रायचूर आणि कलबुर्गी येथील काही निवडक मदरशांमध्ये चालू  केली जाईल.

Teesta Development Project : बांगलादेशाने तिस्ता नदीशी संबंधित प्रकल्पाचे काम चीनऐवजी भारताला दिले !

बांगलादेशाने तिस्ता नदीशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पासाठी चीनची नव्हे, तर भारताची निवड केली आहे. १०० कोटी डॉलरचा हा प्रकल्प भारत पूर्ण करणार असल्याची घोषणा पंतप्रधान शेख हसीना यांनी केली आहे.