Asaduddin Owaisi on Pilgrimage Scheme : (म्‍हणे) ‘योजनेत मुसलमान समाजाच्‍या केवळ २ स्‍थळांची नावे घातली !’

‘मुख्‍यमंत्री तीर्थदर्शन योजने’वर असदुद्दीन ओवैसी यांचे आकांडतांडव !


मुंबई – राज्‍यशासनाने ‘मुख्‍यमंत्री तीर्थदर्शन योजना’ घोषित केल्‍यानंतर त्‍यावर एम्.आय.एम्. पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी आकाडतांडव केला आहे. त्‍यांनी एक्‍सवर म्‍हटले आहे, ‘‘१३९ धार्मिक स्‍थळांपैकी मुसलमान समाजाची केवळ २ पवित्रे स्‍थळे, काही गुरुद्वारा आणि चर्च यांचा समावेश आहे. उर्वरित बहुतांश तीर्थस्‍थळे ही हिंदु आहेत. हे तुष्‍टीकरण नाही का ? ही रेवडी नाही का ?’’
या योजनेंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना देशातील ६६ तीर्थक्षेत्रांना भेटी देण्‍यात येणार आहेत. आयकर भरणारे किंवा ज्‍यांचे वार्षिक उत्‍पन्‍न अडीच लाख रुपयांच्‍या वर आहे, त्‍यांना ही योजना लागू नाही.

संपादकीय भूमिका

  • हा हिंदुस्‍थान आहे. देशात आणि राज्‍यात मंदिरांची संख्‍या अधिक आहे, तसेच महाराष्‍ट्रात बहुसंख्‍य हिंदू आहेत. त्‍यामुळे या योजनेत हिंदु तीर्थस्‍थळांची संख्‍या अधिक असणे स्‍वाभाविक आहे !
  • मुसलमानांना कितीही सोयीसुविधा दिल्‍या, तरी ते संतुष्‍ट होत नाहीत, हेच यातून दिसून येते !