ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाने तिस्ता नदीशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पासाठी चीनची नव्हे, तर भारताची निवड केली आहे. १०० कोटी डॉलरचा हा प्रकल्प भारत पूर्ण करणार असल्याची घोषणा पंतप्रधान शेख हसीना यांनी केली आहे. ढाका येथे पत्रकार परिषदेमध्ये हसीना म्हणाल्या की, चीन सिद्ध आहे; पण भारताने हा प्रकल्प करावा, अशी माझी इच्छा आहे.’ बांगलादेशच्या या निर्णयामुळे भारताच्या सुरक्षेची चिंता संपुष्टात येणार आहे. नुकतीचे पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी चीनचा दौरा केला होता. त्यामुळे ‘हा प्रकल्प चीनला मिळेल’, अशी चर्चा होती.
बांगलादेशाला तिस्ता नदीच्या पाण्याचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करायचे आहे. ही ४१४ किलोमीटर लांबीची नदी भारतातून उगम पावून बांगलादेशात वाहते. बांगलादेशाला तिस्ताचे पाणी संरक्षित करून त्याचे चांगले व्यवस्थापन करायचे आहे. या प्रकल्पासाठी भारतानेही बांगलादेशासमोर प्रस्ताव ठेवला होता.