राज्य दुष्काळात होरपळत असतांना कृषीमंत्री विदेशात गेल्याने वडेट्टीवारांची टीका !

शेतकर्‍यांना बियाण्यांसाठी रांगेत उभे करून ते स्वतः मात्र थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. राज्याला लुबाडण्याचे काम चालू असून सत्ताधार्‍यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात दुष्काळाची भयावहता !

अनेक शहरांना १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. आचारसंहिता असल्याने पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप चालू झालेली नाहीत. मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर असून अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे हानी झाली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील चांदी वितळवण्यासाठी अनुमती मागण्यात आली आहे ! – बालाजी पुदलवाड

मंदिरातील खांब, द्वार, गाभारा येथील जवळपास ७०० किलो चांदी काढण्यात आली आहे. ही चांदी पुरातत्व विभागाच्या निर्देशनांनुसार काढण्यात आली आहे.

ब्राह्मण समाज चुकल्यास ऐकून घ्या; पण विनाकारण कुणी शेपटीवर पाय दिला, तर सोडायचे नाही ! – (प्रा.) सौ. मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

सांगली येथील कार्यक्रमात खासदार (प्रा.) सौ. मेधा कुलकर्णी यांचे आमदार अमोल मिटकरी यांना खडेबोल !

श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील ‘एम्.टी.डी.सी.’चे मद्य आणि मांस विक्री करणारे ‘रेस्टॉरंट’ हटवा !

हिंदूंच्या धार्मिक स्थळी मद्य आणि मांस विक्री करण्यासाठी अनुमती देणे, हे हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर बंधन आणणारे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे.

चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्राप्रमाणे योग्य साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातन संस्था

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने जीवनामध्ये आनंद प्राप्त करता येतो.

‘मराठा साम्राजाचे चलन’ या ‘कॉफीटेबल बुक’मध्ये चिपळूण येथील गौरव लवेकर यांच्या संग्रहातील ३ नाण्यांची निवड

सोन्या-चांदीच्या घडणावळीमुळे लवेकर कुटुंबियांच्या घरी विविध प्रकारची नाणी यायची. त्यामुळे श्री. गौरव यांना नाणी संग्रह करण्याची आवड निर्माण झाली.

Namaz Jihad : कर्नाटकात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणार्‍या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले !

नियमबाह्य कृती करणार्‍यांच्या विरोधात कृती करणार्‍या पोलीस अधिकार्‍याचीच अशी मुस्कटदाबी होत असेल, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणार, हे निश्‍चित ! कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असतांना याहून वेगळे काय अपेक्षित असणार ?

भारत-अमेरिका संबंध समान विचारांवर आधारित आहेत ! – अमेरिकेचे संरक्षणमंत्री

भारत-अमेरिका संबंध समान दृष्टी आणि समान विचार यांवर आधारित आहेत, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. ते येथे आयोजित ‘शांगरी ला डायलॉग्स’ या परिषदेत बोलत होते. ही आशियातील प्रमुख संरक्षण शिखर परिषद आहे.

LokSabha Elections 2024 : यंदा लोकसभा निवडणुकीवर खर्च झाले १ लाख ३५ सहस्र कोटी रुपये !

इतके पैसे खर्च करूनही जनता मतदान करायला जात नाही. यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांवरही आता चर्चा होणे आवश्यक आहे !