भारत-अमेरिका संबंध समान विचारांवर आधारित आहेत ! – अमेरिकेचे संरक्षणमंत्री

अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन

सिंगापूर – भारत-अमेरिका संबंध समान दृष्टी आणि समान विचार यांवर आधारित आहेत, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. ते येथे आयोजित ‘शांगरी ला डायलॉग्स’ या परिषदेत बोलत होते. ही आशियातील प्रमुख संरक्षण शिखर परिषद आहे.

१. एका प्रतिनिधीने ऑस्टिन यांनी भारत-अमेरिका संबंधांविषयी प्रश्‍न विचारला. त्याला उत्तर देतांना ते म्हणाले की, सध्या आमचे भारताशी चांगले संबंध आहेत. आम्ही भारतासमवेत चिलखती वाहनांचे सह-उत्पादक म्हणून काम करत आहोत. या प्रकल्पात प्रगती आहे.

२. ऑस्टिन पुढे म्हणाले की, ‘आम्ही इंडो-पॅसिफिक’ प्रदेशातील आमच्या मित्रांसमवेत संरक्षण उद्योगाला गती येण्यातील अडथळे दूर करत आहोत. इंडो-पॅसिफिकमध्ये अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावत राहील.

३. ‘इंडो-पॅसिफिक’ प्रदेशात तैवान, फिलिपाईन्स, ब्रुनेई, मलेशिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे, तसेच हिंद महासागर अन् दक्षिण चीन समुद्र यांचाही समावेश आहे.