
मुंबई – राज्यात पश्चिम महाराष्ट्रात, तसेच मराठवाड्यात भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी आणि चारा यांची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी विहिरी आटल्याने हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर चालत जावे लागत आहे. चारा नसल्याने जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत. अनेक शहरांना १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. आचारसंहिता असल्याने पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप चालू झालेली नाहीत. मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर असून अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे हानी झाली आहे.
मराठवाड्यात ३ महिन्यांत २६७ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. बियाण्यांवर १८ टक्के जी.एस्.टी. लावला असून बियाण्यांच्या किमती ३५ ते ३८ टक्के वाढल्या आहेत. खताचे अनुदान काढल्यामुळे खतांचे भाव वाढले आहेत.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !