पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मूळ रूप देण्याचे काम सध्या चालू आहे. यात मंदिरातील खांब, द्वार, गाभारा येथील जवळपास ७०० किलो चांदी काढण्यात आली आहे. ही चांदी पुरातत्व विभागाच्या निर्देशनांनुसार काढण्यात आली आहे. ही चांदी मंदिरातील ९ द्वारांना आम्ही लावणार आहोत. त्यासाठी विधी आणि न्याय विभागाकडे ही चांदी वितळवण्याची मागणी आम्ही केली आहे. न्याय विधी विभागाकडून अनुमती आल्यावर चांदीची ९ द्वारे सिद्ध करण्यात येतील. याच समवेत मेघडंबरीचे काम चालू असून तेही काम आम्ही याच चांदीत करणार आहोत, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी पत्रकारांना दिली.