उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या विजयी खासदाराच्या समर्थकांचा मिरवणुकीत गोंधळ !

४ जून या दिवशी निकाल लागल्यानंतर इक्रा हसन यांच्या शेकडो समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. त्या वेळी त्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला.

मिरज येथील ढेरे गल्ली येथे कोयता टोळीचा धुमाकूळ, ३ जणांना अटक !

असुरक्षित मिरज ! गल्लोगल्ली कोयता टोळ्या का निर्माण होत आहेत, हे पहाणे आवश्यक !

२ विमानांची धडक थोडक्यात टळली !

दोन विमानांची धडक झाली असती, तर अनर्थ घडला असता ! हे पहाता विमानतळ प्रशासनाने संबंधित कर्मचारी योग्य प्रकारे कर्तव्य बजावतात का ? हे पहायला हवे !

नारेगाव (छत्रपती संभाजीनगर) येथे ३० रुपयांत पेयाची नशा !

नारेगाव येथे सर्रासपणे अवैध मद्य, गांजा यांची विक्री होत आहे, याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको.

सांगली येथे बनावट नोटांप्रकरणी मिरज येथील एका धर्मांधाला अटक !

बनावट नोटा निर्माण करून त्या समाजात वितरित करणार्‍या धर्मांधांच्या मागे असलेल्या आंतरराष्ट्रीय अदृश्य हातापर्यंत पोचले पाहिजे !

हवामान पालटामुळे अलास्का (अमेरिका) येथील नद्यांचा रंग पालटून झाला नारिंगी !

पालटत्या हवामानामुळे येथील नितळ नद्यांच्या पाण्याचा रंग पालटून तो नारिंगी झाल्याचे एका अभ्यासाअंती निदर्शनास आले आहे.

जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्त एस्.टी.च्या मध्यवर्ती बसस्थानकात वृक्षदिंडी !

जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने एस्.टी.च्या मध्यवर्ती बसस्थानकात सजवलेल्या पालखीत रोपे ठेवून वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रत्येक प्रवाशाने किमान एकतरी रोप लावावे आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.

त्रिशूर (केरळ) येथे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये लाठ्या-काठ्यांद्वारे हाणामारी

ही आहे गांधीवादी आणि अहिंसावादी काँग्रेस ! अशी काँग्रेस हिंदु संघटनांना ‘तालिबानी’ ठरवण्याचा प्रयत्न करते !

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीतील विजयासाठी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन्.डी.ए.) यांचे अभिनंदन….’असा अभिंनदन करणारा संदेश चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदी यांना पाठवला आहे.

गैरकारभाराविरोधात न्यायालयात जाणार ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

‘नीट’ परीक्षापद्धतीत अपप्रकार झाल्याचे प्रकरण