चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन !

जिनपिंग यांनी मात्र अभिनंदन करण्याचे टाळले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

बीजिंग (चीन) – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीतील विजयासाठी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन्.डी.ए.) यांचे अभिनंदन. आम्ही चीन आणि भारत यांच्यात निरोगी अन् स्थिर संबंधांची अपेक्षा करतो’, असा अभिंनदन करणारा संदेश चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदी यांना पाठवला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मात्र अद्याप अभिनंदन केलेले नाही.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी चीनच्या अभिनंदन स्वीकारत म्हटले की, आम्ही परस्पर हित आणि परस्पर संवेदनशीलता यांच्या आधारावर भारत अन् चीन यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी काम करत राहू.