३ लाख ९० सहस्र रुपयांचा माल जप्त !
सांगली, ९ जून (वार्ता.) – ‘बनावट नोटांची छपाई करून ते वितरित केल्याप्रकरणी ७ जूनच्या रात्री मिरज येथील आरोपी अहद महमद अली शेख (वय ४४ वर्षे, रा. शनिवार पेठ, मिरज) याला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख ९० सहस्र रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित आरोपीस न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे’, अशी माहिती सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी ८ जून या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी अहद शेख हा बनावट नोटा वितरित करण्यासाठी कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचला. या वेळी पथकाला शेख याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३ सहस्र ७५० रुपये मिळाले. नोटांची पहाणी केली असता कागद बनावट असल्याचे लक्षात आले. त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
‘संशयित आरोपी शेख याने सांगितल्याप्रमाणे ७० रुपयांच्या बदल्यात १०० रुपयांच्या बनावट नोटा विकत होता. तो १ वर्षांपासून हे काम करत आहे. (१ वर्षापासून काम करत असूनही तो न सापडणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! – संपादक) बनावट नोटा कुणी बाजारात आणल्या ? कुणाला दिल्या ? कुणाच्या सांगण्यावरून हे केले. याचे दलाल कोण आहेत ? या मिळकतीपासून काही मालमत्ता घेतली आहे का ? याची माहिती घेण्यात येणार आहे. |
या प्रकरणी पोलिसांनी शेख याच्या गाळ्यामधील बनावट नोटा छपाई करण्यासाठी वापरलेले यंत्र, कागद, विविध रंगाची शाई, लॅमिनेटर यंत्र, लाकडी स्क्रीन प्रिटींग ट्रे असे साहित्य आणि ५० रुपयांच्या १०० रुपयांच्या नोटांची ३८ बंडले बनावट नोटा, तसेच अर्धवट छपाई केलेले आणि कटिंग करणे बाकी असलेले कागद, भ्रमणभाष संच, असा एकूण ३ लाख ९० सहस्र रुपयांचा माल जप्त केला.
संपादकीय भूमिकाबनावट नोटा निर्माण करून त्या समाजात वितरित करणार्या धर्मांधांच्या मागे असलेल्या आंतरराष्ट्रीय अदृश्य हातापर्यंत पोचले पाहिजे ! |