‘नीट’ परीक्षापद्धतीत अपप्रकार झाल्याचे प्रकरण
मुंबई – नीट (राष्ट्रीय प्रवेश आणि पात्रता परीक्षा) परीक्षेच्या निकालामध्ये एका परीक्षा केंद्रावरील ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. एकाच केंद्रावरील विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळण्याविषयी अपप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या गैरकारभाराविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून राज्यातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे ही प्रवेश परीक्षा रहित करण्याची विनंती करणार असल्याचे आणि पर्यायी आवश्यकता भासल्यास न्यायालयातही याचिका प्रविष्ट करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या वेळी सांगितले.