एडनच्या आखातात व्यापारी जहाजावर हुथी बंडखोरांचे आक्रमण !
येमेनजवळील एडनच्या आखातातील एका व्यापारी जहाजावर हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केल्याचा दावा ब्रिटीश सुरक्षा आस्थापन ‘एम्ब्रे’ने नुकताच केला. या आक्रमणामुळे जहाजाला आग लागली. हे आक्रमण येमेनमधून झाले असून यामागे हुथी बंडखोर असल्याचा संशय आहे.