भाजपशासित राज्यांमध्ये नोकरभरतीची घोषणा !

लोकसभा निवडणुकीतील धक्क्याचा परिणाम !

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला आणि त्याला यंदा २४० जागांवरच विजय मिळवता आला. या अपयशामागे अनेक कारणांसह बेरोजगारी हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. यामुळे निवडणुकीनंतर देशातील अनेक भाजपशासित राज्यांनी नोकरभरतीची घोषणा केली आहे.

१. हरियाणातील भाजपचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी ५० सहस्र पदांसाठी भरतीप्रक्रिया चालू करण्याची घोषणा केली.

२. त्यापूर्वी बिहारमधील भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांच्या सरकारने आरोग्य विभागातील ४५ सहस्र रिक्त पदे भरण्याची घोषणा केली.

. राजस्थानमधील भाजपचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यातील ४१ सहस्र पदांवर चालू असलेली भरती पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

४. उत्तरप्रदेशमधील भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रिक्त सरकारी पदांची माहिती भरती आयोगाकडे पाठवून ती भरण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात विविध विभागांमध्ये अनुमाने २ लाख पदे रिक्त आहेत.

 संपादकीय भूमिका

देशासमोर पूर्वीपासून बेरोजगारीचा प्रश्‍न आहे, हे ठाऊक असतांना तेव्हाच नोकरभरतीचा निर्णय का घेतला नाही ?, असा प्रश्‍न आता उपस्थित होतो !