सात्त्विकता आणि चैतन्यशक्ती असलेला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ !

छायाचित्रमय जीवनदर्शन या ग्रंथाच्या ‘यू.ए.एस्.’ चाचणीत सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ४८६ मीटर आढळली !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ

१. परात्पर गुरुदेवांच्या अवतारी कार्याचा परिचय करून देणारी, तसेच त्यांच्या चैतन्यमय चित्रांमुळे साधकांना भावविभोर करणारी ग्रंथमालिका !

‘परात्पर गुरु डॉक्टरांचे जीवनचरित्र अखिल मानवजातीला ज्ञात व्हावे’, यासाठी ते ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेतून प्रकाशित करण्यात आले आहे. आतापर्यंत याचे ६ भाग प्रकाशित झाले आहेत. यामध्ये परात्पर गुरुदेवांचे अवतारी कार्य, त्यांच्या देहात झालेले दैवी पालट आदी माहिती सचित्र आणि सुंदर रितीने मांडली आहे.

या ग्रंथातील गुरुदेवांच्या विविध भावमुद्रा, त्यांचे सुंदर आणि मनमोहक हास्य अन् कृपावत्सल दृष्टी दर्शवणारी छायाचित्रे पाहून साधकांची भावजागृती होते. हा ग्रंथ हातात घेतल्यावर प्रसन्नता जाणवणे, भाव दाटून येणे, आनंद अनुभवणे, शांत वाटणे इत्यादी अनुभूती साधक आणि वाचक यांना येत आहेत. ग्रंथामुळे अनेकांना परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येते आणि साधनेसाठी स्फूर्तीही मिळते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

२. ‘यू.ए.एस्.’उपकरणाद्वारे ग्रंथाची चाचणी केली असता ग्रंथात नकारात्मक ऊर्जा न आढळता ४८६ मीटर एवढी सकारात्मक ऊर्जा आढळणे

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू, प्राणी, व्यक्ती आदींतील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जांची प्रभावळ मोजता येते. संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाची ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. तुलनेसाठी म्हणून सर्वसाधारण व्यक्तीने लिहिलेले पुस्तक, एका लेखकाने संतांविषयी लिहिलेला ग्रंथ आणि एका संस्थेने प्रकाशित केलेला छायाचित्रमय ग्रंथ यांच्याही चाचण्या करण्यात आल्या. सर्वसाधारण व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकामध्ये सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने आढळून आली. आध्यात्मिक ग्रंथ आणि संतांचे चरित्र यांतील सात्त्विकतेमुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप – सर्वसाधारण व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकात सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा ४.७२ मीटर आढळून आली.

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ४८६ मीटर एवढ्या अधिक प्रमाणात आढळणे, हे ग्रंथात सात्त्विकता आणि चैतन्य असल्याचे लक्षण आहे.

साधकांनो, परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवायला देणारा हा ग्रंथ ‘आपत्काळासाठी संजीवनी आहे’, हे लक्षात घेऊन या ग्रंथातील चैतन्याचा अधिकाधिक लाभ करून घ्या !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक