कारागृहातील कट्टर प्रामाणिक (?) मुख्यमंत्री !

केंद्र सरकारने कलम ३५६ लावून ‘देहलीत राष्ट्रपती राजवट लावावी’, अशी केजरीवाल यांची मनोमन इच्छा असेल, जेणेकरून ‘केंद्रातील मोदी सरकार कसे लोकशाही धुळीस मिळवत आहे’, असे नॅरेटिव्ह चालवता येईल; परंतु त्यांची मनोकामना पूर्ण करतील इतके पंतप्रधान मोदी दुधखुळे नाहीत, हे त्यांना अजूनही समजलेले नाही.

‘क्रेडिट कार्ड पेमेंट नेटवर्क प्रोव्हायडर’ची एकाधिकारशाही संपणार !

आपला पैसा, आपल्या देशात होणारे व्यवहार आणि त्यातील पैसा मात्र विदेशी आस्थापनांना अशी स्थिती आतापर्यंत होती. आता मात्र हे टाळता येणे शक्य आहे.

हिंदु मंदिरांचा विध्वंस केल्याने पाकिस्तान उद्ध्वस्त !

स्वतःला आध्यात्मिक वारशापासून दूर ठेवण्यासाठीच्या प्रक्रियेतील जाणूनबुजून मंदिराचा विध्वंस करणे, हा एक भाग आहे. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये बुद्धीहीन हिंसाचार उफाळून आला आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक दुर्बलता निर्माण होऊन त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडलेले आहेत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत निवासासाठी राहिल्यामुळे त्यांच्या माध्यमातून चैतन्य मिळून २ साधिकांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता उणावणे

काही जणांकडे पाहिल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूती येते; पण पू. आजींकडे पाहिल्यावर अतिशय शांत वाटते.

शांत आणि प्रेमळ स्वभाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला त्रिवेंद्रम् (केरळ) येथील कु. आयुष साईदीपक (वय ९ वर्षे) !

आयुषला आश्रमात येण्याची अनुमती मिळाली. त्याने स्वतःची बॅग अतिशय व्यवस्थित भरली. ‘तेथे जात आहोत, तर प्रत्येक गोष्ट परिपूर्णच असायला हवी’, असे त्याला वाटत होते.

रेल्वेने प्रवास करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यानंतर साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेले सकारात्मक पालट !

‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आपल्याला संतांचा सत्संग मिळतो. पू. (सौ.) अश्विनीताईंनी घेतलेल्या सत्संगामुळे माझे कितीतरी जन्मांचे प्रारब्ध न्यून झाले असेल.’

अंतर्मुखता, निर्मळता आणि इतरांचा विचार करणे हा स्थायीभाव असणार्‍या सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

‘इतरांचा विचार करणे’ हा पू. आजींचा स्थायीभावच आहे. खोलीत कुणी झोपत असेल आणि पंखा लावायचा असेल, तर इतरांना न सांगता त्या स्वतःच लावतात.

जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !

‘रश्मी बर्वे यांनी वर्ष २०२० मध्ये वडिलांच्या शैक्षणिक दस्तावेजांच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र काढले होते; पण त्यासाठी त्यांनी वडिलांचे खोटे शैक्षणिक प्रमाणपत्र सादर केले आहे,’ असा त्यांच्यावर आरोप आहे.

अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !

‘अमरावती येथून ४ एप्रिल या दिवशी नवनीत राणा यांचे आवेदन प्रविष्ट करणार आहे. नितीन गडकरी यांच्यानंतर नवनीत राणा यांना सर्वाधिक मते मिळतील’, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश

वैद्यकीय क्षेत्रातील असा निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवाचे बरेवाईट करण्यास कारणीभूत ठरू शकतो.