पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत निवासासाठी राहिल्यामुळे त्यांच्या माध्यमातून चैतन्य मिळून २ साधिकांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता उणावणे

संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

‘आम्हा दोघींना तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींच्या (वय ९१ वर्षे) खोलीत निवासाची संधी मिळाली. पू. आजींच्या चैतन्यमय अस्तित्वामुळे प्रतिदिन आम्हाला चैतन्य मिळू लागले. पू. आजींचे वागणे, बोलणे एखाद्या लहान बाळासारखे आहे. त्या अतिशय निर्मळ मनाच्या आणि प्रेमळ आहेत. त्यांच्या सहवासात असतांना आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचीच सातत्याने आठवण येते.

कु. तृप्ती कुलकर्णी

त्या सतत ‘नारायण’, ‘नारायण’, असे पुटपुटत नामजप करत असतात. त्यामुळे आम्हालाही नामजप करण्याची आठवण होते. कधी आम्हाला बरे वाटत नसल्यास त्या प्रेमाने आमची विचारपूस करतात आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याची आठवण करून देतात.

एकदा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पू. दातेआजींच्या सून सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांना सांगितले, ‘‘काही जणांकडे पाहिल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूती येते; पण पू. आजींकडे पाहिल्यावर अतिशय शांत वाटते. त्यांच्याकडे पाहून आनंदाच्याही पुढे असलेली शांतीची अनुभूती येते.’’ त्यांनी काढलेल्या या उद्गारांची अनेक साधकांनाही अनुभूती आली आहे.

सौ. संगीता श्रीकांत चौधरी

अशा संतरत्नांच्या सहवासात राहिल्यामुळे आम्हा दोघींच्याही आध्यात्मिक त्रासाची तीव्रता न्यून होऊन आमच्या त्रासाचे स्वरूप ‘मध्यम’ झाल्याचे एका संतांनी सांगितले.

आमच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता न्यून केल्यामुळे आम्ही दोघी पू. दातेआजी आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

 

 

– कु. तृप्ती कुलकर्णी आणि सौ. संगीता श्रीकांत चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.२.२०२४)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.