शांत आणि प्रेमळ स्वभाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला त्रिवेंद्रम् (केरळ) येथील कु. आयुष साईदीपक (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. आयुष साईदीपक हा या पिढीतील एक आहे !

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 

१. शांत स्वभाव

कु. आयुष साईदीपक

‘कु. आयुष याचा स्वभाव शांत असून त्याला कधीही राग येत नाही. मला कधी राग आला, तर तो मला शांतपणे विचारतो, ‘‘तुला एवढा राग का आला आहे ?’’ माझ्या काही चुका लक्षात आल्यास तो मला त्या शांतपणे सांगतो.

२. प्रेमभाव

आयुष कधी शाळेत गेला नाही, तर त्याचे वर्गमित्र त्याला ‘तू शाळेत का आला नाहीस ?’, असे विचारतात. शाळेतील मुलांना तो हवाहवासा वाटतो. आयुषही त्यांच्यावर पुष्कळ प्रेम करतो आणि ज्या वर्गमित्रांना अभ्यासात अडचण येते, त्यांना तो साहाय्य करतो.

३. आईला घराकामांत साहाय्य करणे

सौ. अंजना साईदीपक

७ वर्षांचा असल्यापासून आयुष घरातील लादी पुसणे, देवघर स्वच्छ करणे इत्यादी कामे करतो. तो त्याच्या क्षमतेनुसार घरातील छोटी छोटी कामे करतो.

४. भारतीय भाषा आवडणे

आयुषचे वडील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या इंग्रजी भाषेतील सत्संगांच्या ध्वनीचकत्या ऐकतात. तेव्हा आयुष त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या मराठी भाषेतील सत्संगांच्या ध्वनीचकत्या लावण्यास सांगतो. त्याला इंग्रजी भाषेऐवजी ‘मल्याळम्’ या त्याच्या मातृभाषेत बोलायला आवडते.

५. सेवेची तळमळ

मार्च २०२२ मध्ये आम्ही एकदा कोचीन येथील सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा त्याने तेथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची बांधणी सेवा, तसेच स्वयंपाकघरात १२ दिवस प्रतिदिन १ – २ घंटे सेवा केली. तो त्याच्या वडिलांनाही सेवेची आठवण करून देतो आणि त्यांना सेवेत साहाय्यही करतो. एप्रिल २०२२ मध्ये आम्ही त्याला ‘तू सत्संग घेणार का ?’, असे विचारल्यावर तो त्वरित ‘हो’ म्हणाला. त्याने ‘सत्संग कसा घ्यायचा ?’, हे शिकण्याचीही सिद्धता दर्शवली.

६. एखाद्या नियोजनात पालट झाल्यास तो ती परिस्थिती सहजतेने स्वीकरतो.

७. आश्रमात साधकांच्या समवेत रहायला आवडणे

एकदा एका शिबिरासाठी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचे नियोजन करत होते. तेव्हा मी आयुषला सांगितले, ‘‘तुला शिबिरासाठी नेता येणार नाही.’’ त्यावर तो मला म्हणाला, ‘‘मलाही साधकांच्या समवेत रहाण्याचा आनंद घ्यायचा आहे.’’ काही वेळाने मात्र त्याने ‘माझ्या समवेत जाता येणार नाही’, हे स्वीकारले. काही दिवसांनी आयुषला आश्रमात येण्याची अनुमती मिळाली. त्याने स्वतःची बॅग अतिशय व्यवस्थित भरली. ‘तेथे जात आहोत, तर प्रत्येक गोष्ट परिपूर्णच असायला हवी’, असे त्याला वाटत होते. त्याने बॅग भरण्यासाठी मलाही साहाय्य केले.

८. आश्रमात अर्पण देण्यासाठी वडीलधार्‍यांकडून मिळाळेले पैसे साठवून ठेवणे

जेव्हा आयुषला वडीलधार्‍यांकडून पैसे मिळतात, तेव्हा आश्रमात अर्पण देण्यासाठी तो ते पैसे साठवून ठेवतो. या वेळी आश्रमात जातांना त्याने साठवलेले पैसे समवेत नेण्याचे ठरवले. बरीच नाणी असल्याने त्याने १ आणि २ रुपयांची नाणी वेगळी करून ती वेगवेगळ्या छोट्या पिशव्यांत ठेवली, जेणेकरून आश्रमातील साधकांना नाणी मोजणे सोपे होईल. तो हे सर्व पुष्कळ भावपूर्ण करत होता.

९. व्यष्टी साधना गांभीर्याने करणे

आयुष त्याला सांगितलेला नामजप प्रतिदिन पूर्ण करतो. तो सकाळी आणि सायंकाळी स्तोत्रपठण करतो. संस्कृत भाषेतील श्लोक तो सहजतेने आत्मसात करतो. त्याला त्याची चूक सांगितली, तर ‘ती चूक पुन्हा होणार नाही’, यासाठी तो प्रयत्न करतो. साधनेच्या संदर्भात आम्ही त्याला जी काही सूत्रे सांगतो, त्यांचे तो आज्ञापालन करतो आणि ती अधिकाधिक कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो.

१०. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ तो अधूनमधून वाचतो. त्या वेळी तो त्यात मग्न होऊन जातो.

११. जेव्हा आम्ही आश्रमात आलो, तेव्हा आश्रमातील बहुतांश गोष्टी त्याला आधीच ठाऊक होत्या.

१२. संतांप्रती भाव असणे 

आयुषमध्ये संतांप्रती भाव आहे. तो त्यांचे सत्संग आवडीने ऐकतो, उदा. एक संत साधक किंवा जिज्ञासू यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ सत्संग घेतात. या सत्संगांना मी आणि आयुषचे वडील (श्री. साईदीपक गोपीनाथ) उपस्थित रहातो. त्या वेळी आयुषही या कार्यक्रमांना उपस्थित रहातो.

१३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

अ. मी त्याला विचारले, ‘‘जर तुला आश्रमात माझ्याविना एकटेच रहायला सांगितले, तर तू काय करशील ?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘मी एकटा आश्रमात राहीन आणि रात्री सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत झोपीन.’’

आ. आयुषने एखादी कृती केल्यावर त्याचे वडील त्याला ‘तू हे कसे केलेस ?’, असे विचारतात. तेव्हा तो नेहमी ‘परम पूज्य डॉक्टरांनी करून घेतले’, असे म्हणतो.

१४. जेव्हा आयुषचे वडील चिंतेत असतात, तेव्हा आयुष त्यांच्या मांडीवर जाऊन बसतो किंवा त्यांना मिठी मारतो आणि त्यानंतर काही मिनिटांनी त्याच्या वडिलांचे मन स्थिर होते.

१५. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

मंदिरात गेल्यावर तो ‘तेथील सूक्ष्मातील स्पंदने कशी आहेत ? मंदिराचा रंग सात्त्विक आहे का ?’ इत्यादी गोष्टी सूक्ष्मातून जाणण्याचा प्रयत्न करतो. घरातील एखाद्या वस्तूकडे पाहून त्याला ‘तुला काय जाणवले ?’, असे विचारल्यावर तो त्याचे उत्तर अचूक देतो.

१६. कु. आयुष साईदीपक याला आलेल्या अनुभूती

अ. आश्रमातील ध्यानमंदिरात असलेल्या सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांमध्ये त्याला जिवंतपणा जाणवला.

आ. मार्च ते जून २०२१ या दळणवळण बंदीच्या कालावधीत आम्ही तिघे वेगवेगळ्या ठिकाणी होतो. मी त्रिवेंद्रम् (केरळ) येथे होते आणि आयुष अन् त्याचे वडील मैसुरू (कर्नाटक) येथे होते. या परिस्थितीतही आयुष शांत होता. त्या वेळी तो म्हणाला, ‘‘मैसुरूमध्ये असतांना परात्पर गुरुदेव सतत माझ्या समवेत होते’, याची अनुभूती मी घेतली. त्यामुळे ‘तू (आई) माझ्या समवेत नव्हतीस’, याची चिंता मला वाटली नाही.’’

– सौ. अंजना साईदीपक (कु. आयुषची आई), त्रिवेंद्रम्, केरळ. (२९.८.२०२२)