हिंदु मंदिरांचा विध्वंस केल्याने पाकिस्तान उद्ध्वस्त !

भारताने यापासून धडा घ्यावा !

प्रतिकात्मक छायाचित्रं

पाकिस्तानमध्ये जाणीवपूर्वक विशेषतः हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस केल्याने त्याच्यासमोर मृत्यूचे प्रमाण वाढणे, नासधूस, सार्वभौमत्व नष्ट होणे, आर्थिक चणचण आणि शेजारी राष्ट्रांशी शत्रूत्व अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतातही अनेक राजकारणी आणि राजकीय पक्ष देशाला सर्वनाशाच्या मार्गावर ढकलण्यासाठी सक्रीय आहेत.

१. पाकिस्तानमध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाची हानी अन् त्यामुळे वाढलेली विकृती

भारतातील पवित्र भूमीतील वायव्य दिशेचा भाग हा सिंधु आणि सरस्वती या नद्या अन् त्यांच्या शाखा यांमुळे सुपीक प्रदेश आहे. या प्रदेशातील शहरे आणि गावे यांमध्ये १०० वर्षांपासून अनेक पवित्र तीर्थे, शैव, वैष्णव पंथांची मंदिरे, बुद्ध, जैन यांची मंदिरे, शीख गुरुद्वारा आणि देवीची मंदिरे आहेत. याउलट पाकिस्तानमधील वहाबी सलाफी शासनकर्ते आणि नागरिक यांना वगळणे अन् दलाली करणे या कृतींमुळे पाकिस्तान हे अयशस्वी, कर्जबाजारी, हिंसाचारी आणि योग्य तर्‍हेने न सांभाळता येणारे राष्ट्र बनले आहे. पाकिस्तानमधील मुल्लांच्या (इस्लामच्या अभ्यासकांच्या) जीवनशैली सदोम आणि गमोरा यांच्याप्रमाणे लज्जास्पद आहेत. (सदोम आणि गमोरा ही दोन शहरे दुष्टपणामुळे देवाने नष्ट केली, असे कुराणमध्ये म्हटले आहे.) पाकिस्तानी शासनकर्ते हे केवळ संपत्तीचा व्यय करत नसून पैशांसाठी ते आपल्या नागरिकांचा सौदा करत आहेत.

कर्नल सी.एम्. रामाकृष्णन् (निवृत्त)

दुसर्‍यांकडून आयात केलेल्या विचारधारेमुळे एकेकाळी पवित्र असलेली सिंधु आणि सरस्वती नद्यांवरील भूमी अपवित्र झाली आहे, तसेच तेथील लोकांना त्यांच्या आध्यात्मिकतेचा विशाल वारशांपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांचे प्रयत्न प्राण्याप्रमाणे स्वतःला वाचण्यासाठी प्रयत्न करणे, सत्ता आणि जात वाचवण्यासाठी प्रजनन करणे इत्यादी भौतिक गोष्टींवरच होत आहेत. ते केवळ त्यांना वारसा म्हणून मिळालेली धर्माच्या ज्ञानाविषयीची संपत्ती ओळखण्यात आणि राखून ठेवण्यामध्ये अपयशी ठरले आहेत, असे नाही, तर स्वतःचे मूळच उखडून टाकण्याच्या मार्गावर आहेत.

स्वतःला आध्यात्मिक वारशापासून दूर ठेवण्यासाठीच्या प्रक्रियेतील जाणूनबुजून मंदिराचा विध्वंस करणे, हा एक भाग आहे. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये बुद्धीहीन हिंसाचार उफाळून आला आहे, तेथील नागरिकांचा अवमान होत आहे आणि त्याविषयी गोंधळात टाकणारे निर्णय दिले जात आहेत. श्रेयस (हितकारक) आणि प्रेयस (सुखकारक) यांच्यामधील भेद ओळखण्याची शासनकर्त्यांची क्षमता नसल्याने अनियंत्रित कारभारामुळे पाकिस्तानमध्ये आर्थिक दुर्बलता निर्माण होऊन त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडलेले आहेत. दक्षिण भारतात एक प्रथा आहे की, भाविक लोक शिवाच्या मंदिरातील धूळ घरी येऊ नये; म्हणून स्वतःची विजार झटकत असतात. त्याप्रमाणे मंदिरांची संपत्ती लुटणे आणि त्यांचे पवित्र घाट नष्ट करून अपवित्र करणे यांमुळे पाकिस्तानमधील अर्थव्यवस्था कोसळली आहे. त्यामुळे पाकच्या सीमांवर अशांतता नांदत आहे.

पाकिस्तानमध्ये सतत पोसला गेलेला जिहाद आणि आतंकवाद अन् आयात केलेली विचारधारा, आध्यात्मिक पाया नसणे यांमुळे बळजोरीने धर्मांतर करणे, गुलामगिरी आणि खतना (मुसलमान मुलींच्या योनीचा एक भाग काढून टाकला जातो.) या अनेक वाईट गोष्टी घडत आहेत. पाकिस्तानमधील शासनकर्ते नागरिकांचे कल्याण करण्याविषयीची बांधीलकी विसरले आहेत. सर्व अभिजन, जनरल, सरकारी अधिकारी, राजकारणी आणि उद्योजक यांचे ‘लूटणे आणि पळून जाणे’, हे बोधवाक्य बनले आहे.

२. मंदिरे आणि पवित्र स्थळे यांचा विध्वंस

हिंदु धर्मातील ‘आगम’ ग्रंथानुसार (परंपरा किंवा मिळालेले ज्ञान) मंदिरे ही सकारात्मक ऊर्जेची केंद्रे आहेत. महत्त्वाचे, म्हणजे मंदिरे ही सर्वांसाठी समान आहेत. मंदिरांचे संरक्षण करणे, हे शासनकर्त्यांचे दायित्व आहे. मंदिर आणि त्याची मालमत्ता यांचे संरक्षण होत आहे ना, याची त्यांनी खात्री केली पाहिजे. याविषयीच्या अनेक सूचना ‘आगम’मध्ये दिलेल्या आहेत. ‘मंदिराला किंवा त्यामधील देवतांना काही हानी पोचली किंवा त्यांना आदराने सांभाळले नाही, तर शासनकर्ते आणि तेथील लोक यांना समस्या निर्माण होतील’, असे त्यामध्ये म्हटलेले आहे. ‘मंदिरात पूजा न करण्याचे परिणाम अनेक असून त्यामुळे शासनकर्ते, जनता आणि राज्य याच्या भौतिक अन् आध्यात्मिक स्थितीवर वाईट परिणाम होतील’, असे ‘आगम’मध्ये स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानमध्ये ‘आगम’ ग्रंथातील सूचना न पाळता जाणीवपूर्वक मंदिरे आणि पवित्र स्थळांचा विध्वंस करणे, या गोष्टी होत असल्याने त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. धार्मिक तत्त्वांचे पालन न करता अधर्माने वागणे याचा पाकिस्तानच्या भौतिक आणि आध्यात्मिक वातावरणावर पुष्कळ वाईट परिणाम झाला आहे. पाकिस्तानमध्ये जागतिक आतंकवादामध्ये इस्लाम चिडलेला असून जहाल अशा सलाफी विचारधारेने तो वहावत गेला आहे. पाकिस्तानमधील शासनकर्ते आणि नागरिक हे मंदिरे अन् पवित्र स्थळे यांच्याविषयीचे त्यांचे उत्तरदायित्व विसरले आहेत. मंदिरे आणि पवित्र स्थळे ही सर्वांच्या आध्यात्मिक अन् भौतिक कल्याणासाठी आहेत.

– कर्नल सी.एम्. रामाकृष्णन् (निवृत्त), देहली