Karnataka Hanuman Flag Removed : पोलिसांनी १०८ फूट उंच फडकणारा हनुमान ध्वज उतरवला !

मंड्या (कर्नाटक) येथील केरागाडू गावातील घटना
विरोध करणार्‍या गावकर्‍यांवर केला लाठीमार !

Karnataka Boy Paraded Naked : एका विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांनी नग्न करून मारहाण करत काढली धिंड !

कलबुर्गी (कर्नाटक) येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करतांना त्यात सहभागी न झाल्याचे प्रकरण !

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सातारा येथील धर्मप्रेमी कु. लीना सावंत हिची धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड !

नागेवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या वर्गातील प्रशिक्षणार्थी कु. लीना रघुनाथ सावंत हिची ‘धनुर्विद्या’ या क्रीडा प्रकारात शिवाजी विद्यापिठाच्या संघात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

श्रीराममंदिराची प्रतिकृती पहाण्यासाठी भाविकांचा प्रतिसाद : प्रतिदिन होम-हवन !

अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने मिरज शहरात श्रीराममंदिराची प्रतिकृती तालुका क्रीडा संकुल येथे उभारण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी देण्याच्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर शिक्षण क्षेत्रातून टीका !

‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’अंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी देण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर शिक्षण क्षेत्रातून टीका होत आहे. विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल किंवा हिरवा ठिपका दिल्याने भेदभाव निर्माण होऊ शकतो.

‘पोक्सो’ प्रकरणातील बालकांचे जबाब तातडीने नोंदवले गेले पाहिजेत ! – न्यायमूर्ती मोहिते-डेरे

बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना घृणास्पद असून त्या खटल्यांमध्ये बालकाचा जबाब आणि साक्षीपुरावे तातडीने नोंदवले गेले पाहिजेत. पोक्सो न्यायालयाच्या इमारतीत खटल्यांची सुनावणी जलदगतीने होऊन पीडित बालकांचे अश्रू पुसले जातील. त्यातूनच ‘पोक्सो’चा हेतू सफल होईल’

संपादकीय : बिहारमध्ये पुन्हा सत्तापालट !

जनता आणि राज्य यांच्या हितासाठी राष्ट्रहितैषी विचारसरणीचे स्थिर सरकार हवे, हे राजकीय पक्ष केव्हा लक्षात घेणार ?

आदेश देऊनही पुणे शहरातील बहुमजली इमारतींवरील ‘रुफ टॉप हॉटेल्स’वर कारवाई नाही !

बहुमजली इमारतींचा लाभ घेत शहरांमध्ये ‘रुफ टॉप हॉटेल’ नावाची संकल्पना पुढे येत आहे; मात्र ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. अशा हॉटेल्सना महापालिका, जिल्हाधिकारी प्रशासन यांच्याकडून अनुमती दिली जात नाही.

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची स्थिती जाणा !

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी विजयपूर (कर्नाटक) येथील मध्यवर्ती कारागृहात पूजा करणार्‍या हिंदु बंदीवानांवर मुसलमान बंदीवानांकडून आक्रमण करण्यात आले. मुसलमान कारागृह अधीक्षकांनी यासाठी चिथावणी दिली होती.