मुंबई महापालिका मनोरंजन करात वाढ करणार !

मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग आणि खेळ यांच्यावरील रंगभूमी करात वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. गेल्या १३ वर्षांत ही करवाढ करण्यात आली नव्हती.

आनंदी जीवनासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था 

आताच्या कलियुगात स्वतःच्या कुलदेवतेचा, तसेच श्री दत्तगुरूंचा नामजप, म्हणजेच साधना केल्यास जीवनातील दुःखांचे निवारण होऊ शकते.

नागपूर येथे स्कूल बस संघटनेच्या संपामुळे पालकांची तारांबळ !

केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याच्या विरोधात ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेल्या संपानंतर ३ जानेवारीपासून स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनीही एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला.

चुनाभट्टी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या चुनाभट्टी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तोडफोड केल्यावरून कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सरचिटणीस अभिजित मोकाशी आणि उपाध्यक्ष विश्वजित मोकाशी यांच्यावर वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षांवर नगर येथे प्राणघातक आक्रमण !

संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असतांना २ जानेवारीला काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाल्याची घटना घडली आहे.

यापुढे कोणताही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही ! – मनोज जरांगे

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारसमवेतच्या चर्चेला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे ३ जानेवारी या दिवशी मनोज जरांगे आणि मुंबई येथील मराठा आंदोलक यांच्यात बैठक पार पडली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य कौतुकास्पद ! – पूज्य मुनी श्री १०८ पूज्य सागरजी महाराज

या वेळी पूज्य मुनी श्री १०८ पूज्य सागरजी महाराज म्हणाले, ‘‘तुम्हाला तुम्ही करत असलेले कार्य विशेष प्रयत्न करून सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शांतीने कार्य करत रहा. तुमचे कार्यच जगाला तुमची ओळख करून देईल.

हिंदु संस्कारांमुळे जगात भारत देश महान ! – प.पू. महेशानंद महास्वामीजी हंचिनाळ 

हिंदु संस्कारांमुळे जगात भारत देश महान आहे. परकियांना मंदिरे फोडता आली; मात्र हिंदूंच्या मनातील भक्ती आणि संस्कार त्यांना तोडता आले नाहीत. पालकांनी मुलांना चांगले संस्कार द्यावेत. संस्कारहीन मानव पशूसमान आहे. मानवजन्म पुन्हा येत नसल्याने चांगले कार्य करून मानवी जीवन सार्थकी लावा.

GangRape Virtual Reality Game : ब्रिटनमध्ये प्रथमच १६ वर्षांच्या मुलीवर ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गेम’मध्ये (आभासी खेळामध्ये) सामूहिक बलात्कार !

मेटाव्हर्स हे एक आभासी जग आहे, जिथे कुणीही आभासी प्रवेश करू शकतो. यात तो त्या ठिकाणी शारीरिकरित्या उपस्थित असल्याची भावना असते. यात स्वतःचे आभासी शरीर निर्माण करता येते.

ISIS Module Maharashtra : आतंकवाद्याने सीरियास्थित संस्थेला पैसा पुरवल्याचे उघड !

अन्वेषण यंत्रणेला आतंकवादी शर्जिल शेखच्या भ्रमणभाषमध्ये अनेक व्हिडिओ सापडले. यातून त्याचा आतंकवादी कारवायांमध्ये सहभागाचे असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत.