समीर गायकवाड यांच्या जामिनाच्या आदेशाच्या विरोधातील अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड यांचा जामीन संमत करण्याचा आदेश वर्ष २०१७ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिला होता.

अटल सेतू प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील घेतलेल्या भूमींसाठी सरकारला कोट्यवधी रुपये मोजावे लागणार !

अटल सेतूच्या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील जासई गावातील संपादित केलेल्या ७ हेक्टर ५१ गुंठे भूसंपादन भरपाईचा निवाडा मुदतीत  केला नसल्याने ती प्रक्रिया ‘व्यपगत’ (अवधी समाप्त) झाल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणी २ आरोपींना पोलीस कोठडी !

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कह्यात घेतलेल्या २ वरिष्ठ अधिकार्‍यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर अर्बन बँकेच्या अपव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अन्वेषण चालू होते.

वैमानिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्याचे आमीष दाखवून फसवणूक !

मुलाला वैमानिकाचे प्रशिक्षण देण्याचे आमीष दाखवून एका मुलीने वडिलांची २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना चेंबूर येथे घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबई’ आणि ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ यांच्या वतीने फेब्रुवारीत व्यापार परिषद ! – डॉ. सुनील मांजरेकर

गेल्या दोन दशकांपासून सक्रीय असलेल्या या ७ व्या परिषदेत जगभरातून ९०० हून अधिक उद्योजकांचा सहभाग अपेक्षित आहे. यात सुमारे ७५० कोटी रुपयांच्या व्यवसायाची नोंद होण्याची अपेक्षा आहे

संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी करा !

‘सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या वतीने येथील क्रांती चौकात १७ जानेवारी या दिवशी ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन’ उत्साही वातावरणात पार पडले.

वाढेफाटा ते आनेवाडी पथकर नाका या महामार्गावरील पोलीस गस्त चालू करा ! – श्रीरंग काटेकर, सामाजिक कार्यकर्ते

निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस गस्त बंद असल्यामुळे महाविद्यालयीन युवतींची छेड काढणे आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

नाशिक येथे अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षाला अटक !

हिंदु धर्मातील संतांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

ठाणे येथे पालिका अधिकार्‍यांची खोटी स्वाक्षरी करून ठेकेदाराने पैसे काढले !

असे प्रकार करून फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !