१३ सहस्र रुपयांची लाच घेतांना मंडल अधिकारी आणि तलाठी यांना रंगेहात पकडले !

१३ सहस्र रुपयांची लाच घेतांना फलटण येथील मंडल अधिकारी जितेंद्र कोंडके आणि सजा फलटणच्या तलाठी श्रीमती रोमा कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 

म. गांधींविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

म. गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा लागू होत नसला, तरी न्यायालयात केलेली खासगी तक्रार नोंद करून घेणे योग्य आहे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलोक पांडे यांनी दिला आहे.

मुंबई येथे नशेत असणार्‍या २१ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍यावर गुन्हा नोंद !

या प्रकरणी वरळी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. बलात्कार १३ जानेवारीला झाल्याचे तिने म्हटले आहे. आरोपीचे नाव हेतिक शाह आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

मराठा आरक्षण मोर्चाचा ए.पी.एम्.सी.तील व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांना फटका

मराठा आरक्षण मोर्चाचा वाशी येथील ए.पी.एम्.सी. बाजारामधील मुक्काम एक दिवस वाढल्याने मुंबई आणि उपनगरे यांना पुरवठा होणार्‍या भाजीपाल्यावर  परिणाम झाला.

मुख्य कार्यक्रमात व्यासपिठावर केवळ २ साहित्यिक, तर १२ राजकारणी असणार !

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये मंचावर साहित्यिक म्हणून केवळ आजी-माजी संमेलनाध्यक्ष दिसणार आहेत, तर १२ राजकारण्यांना निमंत्रित म्हणून स्थान दिले आहे, असे पत्रिकेतील माहितीवरून दिसून येते.

Kerala Governor On Dharna : साम्यवादी विद्यार्थी संघटनेने काळे ध्वज दाखवल्याने केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या !

साम्यवादी सरकारच्या राज्यात राज्यपालांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे म्हणजे लोकशाहीला धोकाच होय !

भारतासमवेतचे संबंध सुधारत आहेत ! – कॅनडाचा दावा

भारत आम्हाला सहकार्य करत आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत.

लाखोंच्या संख्येने सरकारकडे हरकती पाठवा !

 जे अधिवक्ते आहेत, त्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करून अध्यादेशावर हरकती पाठवण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य !

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ५ मासांच्या लढ्यानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या.

Maldives President On RepublicDay : मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू यांनी भारताला दिल्या प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा !

मला आशा आहे की, भारत आणि मालदीव यांच्यातील शतकानुशतके जुनी मैत्री आगामी काळात अधिक घट्ट होईल. मी भारत सरकार आणि नागरिक यांच्यासाठी शांतता आणि विकास यांसाठी शुभेच्छा देतो.