इंडिया आघाडी यशस्वी होणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गाण्यासाठी सर्व जणांना एकत्र गावे लागते. प्रत्येकाने वेगळे गाणे गाऊन चालत नाही. ही आघाडी नव्हतीच. त्यामुळे ती यशस्वी होणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ३ प्रवासी ठार !

जिल्ह्यातील वाठोना शिवणी येथे समृद्धी महामार्गावर २५ जानेवारीच्या पहाटे ५ वाजता एका ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर येथील सिद्धेश्वर विद्यालयातील पोषण आहारात सडलेल्या केळ्यांचे वाटप

शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी वरील गोष्ट घडल्याचे सत्य असल्याचे सांगून ‘संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल’, असे आश्वासन दिले.

‘विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेने अव्वल स्थान पटकावले !

‘विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत  सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. दुसर्‍या स्थानी पनवेल महापालिका, तर तिसर्‍या स्थानी कोल्हापूर महापालिका आहे.

मागासवर्ग आयोगाकडून खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करतांना ब्राह्मणांचेही सर्वेक्षण !

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे.

असगोली (गुहागर) येथील ३ महिलांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

घरामध्ये सासू, जाऊ आणि नणंद या तिघींनी आरती नाटेकर हिचा वारंवार छळ करत तिला सातत्याने घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले जात होते.

रत्नागिरीतील ९२ कोटी रुपयांच्या प्रशासकीय भवनाला शासनाची मान्यता ! – पालकमंत्री उदय सामंत

सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने संमत केले आहेत.  

रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेच्या वतीने शृंगारतळी येथील डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांना वैश्यरत्न पुरस्कार प्रदान

श्रीकृष्ण बेलवलकर हे गेली १५ वर्षे वैश्यवाणी समाज गुहागर तालुका या संस्थेचे सचिवपद सांभाळत आहेत. गुहागर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असते.

Padma Awards 2024 : पद्म पुरस्कार घोषित : ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री !

यंदा एकूण १३२ जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले असून यांत ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.

देशभरात भारताचा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा !

देशभरात भारताचा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील कर्तव्य पथावर सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.