बलात्कार प्रकरणी पुणे येथील उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद !

तक्रारदार युवतीची उपनिरीक्षक शिंदे यांची ओळख होती. शिंदे यांनी या युवतीचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी तिच्याकडून महागड्या भेटवस्तूही घेतल्या, तसेच अनेकवेळा तिच्यावर बळजोरी केली. संबंधित युवतीने लग्नाची विचारणा केल्यानंतर शिंदे याने तिच्याशी असलेले संबंध तोडले.

न्यासाचा लौकिक देशात असून तो धार्मिक आणि सांस्कृतिकता यांचे प्रतीक ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगाणा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली चालू केलेल्या महाप्रसादाच्या सेवेसमवेत विविध उपक्रम चालू आहेत.

महाराष्ट्र गुप्तवार्ता पोलीस खात्यातील ९१ पदांवर होणार कंत्राटी भरती !

महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभागाचा आकृतीबंध गृहविभागाने अंतिम केला असून याद्वारे गुप्तवार्ता विभाग आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालयांमध्ये ९१ पदांवर कंत्राटीपद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

डाव्या (साम्यवादी) विचारसरणीची विषवल्ली रोखण्‍यासाठी सजग राजकीय भूमिका आवश्यक ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

डाव्या शक्तींनी कुटुंब-व्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम, संस्कृती ही आपली शक्तीस्थाने पोखरण्याची रणनीती आखली आहे. ईर्ष्या, द्वेष आणि अराजक हाच डाव्यांच्या विचारांचा गाभा आहे. चुकीच्‍या विचारांची मांडणी करून ते पोचवण्‍यासाठी आवश्यक परिसंस्‍था त्‍यांच्‍याकडे आहे.

पिंपरी (पुणे) शहरातील विनाअनुमती शाळांच्या दर्शनी भागात ‘विनाअनुमती शाळा’ असा नामफलक लावावा ! – शिक्षण विभागाचे आदेश

फलक लावून न थांबता या शाळा बंद होणे आणि संबंधितांवर कठोर कारवाई यांसाठी समयमर्यादाही घालणे आवश्यक आहे !

छत्रपती संभाजीनगर येथे १५ दिवसांत मराठी फलक न लावल्यास दुकाने बंद करणार ! – महापालिकेची चेतावणी

महापालिका प्रशासकांनी ७ जानेवारी या दिवशी शहरातील काही भागांत पहाणी करत दुकाने आणि प्रतिष्ठाने यांची नावे राज्यशासनाच्या आदेशानुसार मराठी भाषेत लिहिण्याचे निर्देश दिले, तसेच मोठ्या अक्षरात नावे लिहावे, असेही सांगितले आहे.

मुंबईतील महिला पोलिसांनी वरिष्ठांच्या लैंगिक अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार सर्वत्र प्रसारित !

या गंभीर प्रकाराची गृहखात्याकडून सखोल चौकशी व्हायला हवी !

भूमी गैरव्यवहारावरून छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंबादास दानवे आणि हरिभाऊ बागडे आक्रमक !

अंबादास दानवे म्हणाले की, २५० एकर निर्वासित मालमत्ता विकण्यात येते आणि ३ दिवसांत त्याचा फेरफारही करण्यात येतो. त्यामुळे हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. यावरून जलील आक्रमक होऊन ‘याच बैठकीत संबंधित अधिकार्‍यांनी यावर खुलासा करावा’, अशी मागणी केली.

अतीदक्षता विभागातील व्यक्तीच्या क्रेडिट कार्डवरून सायबर चोरट्यांनी ५ लाख रुपये लुटले !

सायबर चोरट्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित ! तसे झाल्यासच हे प्रकार थांबतील !

राज्यातील १ कोटींहून अधिक रामभक्तांना निमंत्रण देणार !

अयोध्या येथील प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे. त्यानिमित्ताने राज्यभर गृहसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे.