हिंदूंच्या संघटितपणामुळे वादग्रस्त ‘पोस्ट’ प्रकरणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे धर्मांधांवर पोलिसांची कारवाई !

२ धर्मांत तेढ निर्माण होईल, अशी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल, अशी चेतावणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील शेकडो हिंदूंनी पोलीस ठाण्यात जाऊन दिली.

प्रजासत्ताकदिनानिमित्त राज्यात ‘महावाचन उत्सव’ साजरा होणार !

विद्यार्थ्यांना वाचनाची, लिहण्याची आवड निर्माण व्हावी. महान व्यक्तींची ऐतिहासिक कामगिरी समजावी यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताकदिनाच्या सप्ताहामध्ये ‘महावाचन उत्सव’ राबवण्यात येणार आहे.

श्रीरामाचा अवमान करणार्‍या सोहेल याला कुडचडे येथील श्री रामभक्तांनी सर्वांसमक्ष क्षमा मागण्यास भाग पाडले !

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्रीराममंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या गोव्यात ४ घटना घडल्या आहेत.

२६ जानेवारीला ओबीसीही मुंबईत येणार !

जरांगे यांनी सरकारवर दबाव आणण्यापेक्षा, सरकार काय करू शकते आणि काय करू शकत नाही यांचा विचार करून सरकारला वेळ द्यायला पाहिजे. त्यानुसार आपली भूमिका ठरवायला पाहिजे, असा सल्ला बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.

मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री यांनी स्वतः येऊन चर्चा करावी ! – जरांगे

मनोज जरांगे यांची २५ जानेवारीला पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पोचले होते. आंदोलकांशी चर्चा करून त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू, असे जरांगे यांनी त्या वेळी सांगितले; परंतु अखेरीस ही चर्चा निष्फळ ठरली.

‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’कडून राज्यातील ३५० गडांवर प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण !

‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील ३५० गडांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे.

पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा शासनाधीन !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शहरात आखलेल्या धडक मोहिमेत ४७ लाख २२ सहस्र ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि एक वाहन शासनाधीन केले आहे.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये !- डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम १.२ ते १.५ मध्ये राष्ट्र्रध्वजाच्या उचित वापराविषयी प्रावधान केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्र्रध्वजासाठी प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही.

‘श्रीरामजन्मभूमी यशोत्सव समिती कराड’च्या वतीने श्रीरामपूजन आणि प्रसादवाटप !

अयोध्या येथे होणार्‍या श्री रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्ताने येथील ‘श्रीरामजन्मभूमी यशोत्सव समिती’च्या वतीने चावडी चौक या ठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली

मुंबई आणि डोंबिवली येथील जैन मंदिरांत चोर्‍या करणार्‍या सराईत चोरट्याला अटक

मुंबईत विविध ९ पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जैन मंदिरात चोरी केल्याचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.